Tarun Bharat

शिवसेनेचे चार आमदार जरी निवडून आले तर स्थानिकांना शंभर टक्के नोकऱया

Advertisements

खासदार संजय राऊत यांचे आश्वासन

वार्ताहर /झुआरीनगर

वेर्णात मोठी औद्योगिक वसाहत आहे. परंतु इथे स्थानिकांना नोकऱया मिळतात का येथील बहुतेक कंपन्यामध्ये बाहेरचेच लोक काम करतात आणि याचे कुणालाच काही पडलेले नाही. शिवसेनेचे चार जरी आमदार गोव्यात निवडून आले तर 100 टक्के नोकऱया गोमंतकीयांनाच देऊ असे आश्वासन शिवसेनेचे गोवा प्रभारी खासदार संजय राऊत यांनी दिले.

 काल बुधवारी संध्याकाळी सांकवाळ उपासनगरात आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात खासदार संजय राऊत बोलत होते. शिवसेना ही याच कारणांसाठी जन्माला आली. स्थानिकांना नोकऱया मिळाव्या यासाठी बाळासाहेबांना शिवसेना काढावी लागली. गोव्यातील नेते हा विषय का घेत नाहीत. आम्ही हा विषय घेऊ.  तुम्ही 80 टक्के भुमीपुत्राना नोकऱया देणार म्हणता, आम्ही 100 टक्के नोकऱया देऊ असे संजय राऊत म्हणाले.

  यावेळी व्यासपीठावर गोवा राज्य प्रमुख जितेश कामत, गोवा राज्य संपर्क प्रमुख जीवन कामत, महिला संपर्क प्रमुख रिया पाटील, दक्षिण गोवा प्रमुख आलेक्सी फर्नांडिस, उपप्रमुख बाबुराव नाईक्, कुठ्ठाळी संपर्क प्रमुख राजाराम पाटील, कुठ्ठाळी महिला आघाडी प्रमुख भक्ती खडपकर, शांताराम पराडकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेच्या वेगळय़ा धोरणामुळेच आज गेली 60 वर्षे शिवसेना महाराष्ट्रात आहे. दिल्लीत शिवसेनेचे 22 खासदार आहेत. ही लहान गोष्ट नाही. शिवसैनिकांनी वेर्णात शिवसेनेचा भगवा लावून फिरले पाहिजे तसेच सर्व कंपन्याना पत्र देऊन त्यांनी किती स्थानिकांना नोकऱया दिल्या याची यादी घेतली पाहिजे. हे असे केल्याशिवाय शिवसेना काय असते ते त्यांना कळणार नाही असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्याना दिला.

गोव्याला वाचविण्यासाठी शिवसेनेचे आमदार निवडून यायलाच हवेत

गोवा हे लहान राज्य आहे. परंतु जगाच्या नकाशावर तो झळकतो. आज या गोव्याची लुटमार चालू आहे. गोवा लुटून मुंबई तसेच परदेशात मालमत्ता घेत आहेत. समुद्र किनारे रशियनांच्या जाळय़ात आहेत व तिथे पोलीस जाऊ शकत नाहीत. ड्रग्सच्या विळख्यात तरूणपिढी सापडलेली आहे. पण या समस्य़ांवर कुणाचे लक्ष नाही. सर्व स्तरावर गोव्याची बदनामी होत आहे. गोवा हे शांत स्वभावाचे राज्य आहे. परंतु सद्यस्थिती पाहता येणाऱया काळात गोवा हा गोवा राहणार नाही. सर्व पक्षानी गोव्याचा फक्त वापर केलेला आहे. सध्या काँग्रेसवाले, तृणमूल काँग्रेसमध्ये जात आहेत. या पक्षाचा गोव्याशी काहीच संबंध नाही. अशा या आमदाराना गोव्याचे पडलेले नाही.  या परिस्थितीत गोव्य़ाला वाचविण्यासाठी एक संधी शिवसेनेला मिळायला हवी असे खासदार राऊत यांनी सांगितले.

गोव्याच व महाराष्ट्राच भावनिक नात आहे

गोव्याचे आणि महाराष्ट्राचे नात हे फक्त मातीचे नात नसून ते भावनिक नात आहे. देशाला जर कुणी संगीत दिलेले आहे तर ते गाव्याने व या संगीताचे सूर सर्वत्र घुमतात. पण काही लोकांनी गोवा बेसुर करण्याचे काम केलेले आहे. येथील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. सर्वत्र कचऱयाचे साम्राज्य दिसत आहे. शिवसेनेची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आपण जो भगवा घालतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे व शिवाजी महाराज हे फक्त शिवसेनेचे दैवत नसून ते देशाचे दैवत आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी महाराजांनी पोर्तुगीजांशी लढाई केली. प्रत्येक हिंदुत्ववादी माणसाच ते दैवत आहे. गोव्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. या या व्यवसायावर लहान मोठे सर्व उद्योग चालतात. आता या सर्व व्यवसायावर जेव्हा भूमीपुत्रांचा पगडा असेल तरच भूमीपूत्र वर येईल असे खासदार राऊत यांनी पुढे सांगितले.

गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनीही गोव्य़ाच्या सरकारवर चौफेर टिका केली व गोव्याला वाचविण्यासाठी शिवसेनेशिवाय पर्याय नसल्य़ाचे आपल्या भाषणात सांगितले. यावेळी कार्यककर्त्याना मान्यवरांच्याहस्ते शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन शांताराम पराडकर यांनी केले तर भक्ती खडपकर यांनी आभार व्यक्त केले.

Related Stories

सरकारने मदत दिल्यास ‘पॅलेटिव्ह केअर’च्या रूग्णांना मोफत सेवा देऊ

Amit Kulkarni

गुढीपाडव्यानिमित्त उल्हास ज्वेलर्सतर्फे ‘सुवर्ण नाणी व बार’वर खास ऑफर

Amit Kulkarni

दत्तगड बेतोडा येथे अडीच लाखाची चोरी; गॅस सिलीडरही लांबविले

Amit Kulkarni

गोवा डेअरीचा नफा-तोटा आमसभेतून जाहीर करा अन्यथा निवडणूक घ्या

Amit Kulkarni

दहावी, बारावीचे वर्ग आजपासून

Patil_p

आता जनतेनेच परिवर्तन घडवून आणावे

Omkar B
error: Content is protected !!