Tarun Bharat

शिवसेनेच्यावतीने दगडूशेठ गणपतीस 61 किलो माव्याचा मोदक अर्पण

ऑनलाईन टीम / पुणे : 


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेनेच्यावतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस 61 किलोचा माव्याचा मोदक अर्पण करण्यात आला तसेच यावेळी महाआरती देखील करण्यात आली.

 
या प्रसंगी भगवान गणेशांना मागणे – संकल्प करतांना डॉ गो-हे यांनी देवाचे आभार मानले. तसेच उद्धवजी ठाकरे यांना दीर्घायुरारोग्य मिळावे, उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार केले.परंतु सर्व जग, महाराष्ट्र, पुणे मुंबई अशा सर्वत्र विनाश करणार्‍या महामारी व संकटातून मुक्तता मिळावी, कोरोना महामारी व आताच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मरण पावलेलयांच्या आत्म्यास शांति मिळो, तसेच या सर्व आपत्ती ग्रस्तांचे योग्य पुनर्वसन व्हावे व सेवा करण्याचे बळ उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे व सरकारला मिळावी.कोरोना परिस्थितीतून मार्ग मिळावा,अशी प्रार्थना केली.

या प्रसंगी रवींद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख बाळाभाई कदम , शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, अशोक हरणावळ, नगरसेविका पल्लवी जावळे,संगीता ठोसर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

न्यायालयीन कामकाज 8 जूनपासून सुरू

datta jadhav

पुणे विभागात ३८० स्टेशन मास्तर जाणार सामूहिक रजेवर

Archana Banage

”…मग वर्षा गायकवाड तुम्ही विद्यार्थ्यांच्या जीवाशी का खेळत आहात?”

Archana Banage

पुणे विभागातील 1 लाख 49 हजार 551 रुग्ण कोरोनामुक्त

Tousif Mujawar

राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच जेलमध्ये जाणार; मोहित कंबोज यांचं ट्विट

Archana Banage

रिफायनरी १०० टक्के होणारच- मंत्री अजयकुमार मिश्रा

Archana Banage