Tarun Bharat

शिवसेनेच्या बोटाला धरुनच भाजप मोठा झाला हे विसरु नका

चंद्रकांत पाटलांना शंभूराज देसाईंचा टोला

सातारा / प्रतिनिधी

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अडवाणी साहेबांना विचारुन आपली खात्री करावी की हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाप्रमुख उद्धवसाहेब यांच्या बोटाला धरुनच भाजपा महाराष्ट्रात मोठी झाली आहे. नैराश्येतून वक्तव्य करणे टाळावे अन्यथा त्यांचा गावागावात शिवसैनिक समाचार घेतील, असा सुचक इशाराच राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषदेत लगावला. दरम्यान, बंगल्यात बिबटय़ा आल्याप्रकरणी छेडले असता ते म्हणाले, वाघ वाघालाच भेटायला येणार बच्छड्याला नाही, असा उपरोधीक टोलाही त्यांनी पारंपारिक विरोधकांना लगावला.

साताऱ्यातल्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, माझ्याच जिह्यात येवून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेनेवर टीका करत असतील तर ते मी कदापि खपवून घेणार नाही. कोणताही आधार नसताना वक्तव्य करणे चुकीचे आहे. भाजपाच्यावतीने अनेक तारखा महाविकास आघाडीचे सरकार पडण्याबाबत त्यांनी दिल्या. कधी दोन महिन्याच्या तर कधी दोन वर्षाच्या. पण मुख्यमंत्री उद्धवसाहेब हे आमचे नेतृत्व कणखर आणि अभ्यासू आहे. अनेक संकट आली त्या संकटात आली. त्या संकटाला आम्ही धिराने सामना केला. चंद्रकांत पाटील यांनी नैराश्येतून वक्तव्य करणे टाळावे, तुमच्या भाजपाचेही सुरुवातीला केवळ दोनच खासदार होते. इतर पक्षांची जवळीक त्यावेळी करुन सरकार केले होते हे विसरला काय? आज प्रमोद महाजन नाहीत, गोपिनाथ मुंढे नाहीत त्यांनी भाजपासाठी मेहनत घेतली. लालकृष्ण अडवाणी साहेब आहेत त्यांना चंद्रकांत पाटलांनी विचारावे की हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बोटाला धरुनच महाराष्ट्रात गाव पातळीवर भाजपा पोहचली आहे. निवडणूकीवेळी युतीधर्म शिवसेनेने पाळला होता. त्यानंतर भाजपाने युती धर्म पाळला नाही हेही त्यांनी तपासावे, अशी टीप्पणी केली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी विचारले असता एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ दिली आहे. तरीही कर्मचारी कामावर येत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तिथे एखादी संघटना म्हणून कारवाईमध्ये दुजाभाव केला जाणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी आता कामावर यावे, लोकांना सेवा द्यावी, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले आहे.

Related Stories

आकडे अपलोड करा; अन्यथा सस्पेंड व्हाल

datta jadhav

सातारा शहराला पावसाने झोडपले

Patil_p

मुसळधार पावसाने रस्ते जलमय

Amit Kulkarni

Satara; सुभेदार विजय शिंदे यांचे पार्थिव विसापूर गावात दाखल

Abhijeet Khandekar

जिल्हा कारागृहातील ‘त्या’ कैद्यावर आणखी एक गुन्हा दाखल

datta jadhav

सातारा : रायरेश्वर युवा प्रतिष्ठान यांचा भव्य दीपोत्सव सोहळा

Archana Banage
error: Content is protected !!