Tarun Bharat

शिवसेनेच्या महिला खासदाराला ईडीचे समन्स

ऑनलाईन टीम / वाशिम :

मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या कंपनीचे संचालक सईद खान यांना सोमवारी ईडीने अटक केली आहे. त्यांच्या चौकशीनंतर ईडीने आज भावना गवळी यांना समन्स पाठवले असून, सोमवारी (दि. 4) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

बालाजी पार्टिकल बोर्ड या भावना गवळी यांच्या कंपनीत 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या आरोपांची शहानिशा ईडीकडून सुरू आहे. यापूर्वी या प्रकरणात गवळींशी संबंधित वाशिम आणि यवतमाळमधील पाच संस्थांवर छापे टाकण्यात आले होते. या ठिकाणांवरुन ईडीने अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच सोमवारी कंपनीचे संचालक सईद खान यांनाही ईडीने अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, आज ईडीने खासदार गवळी यांना समन्स पाठवले आहे. त्यांना 4 ऑक्टोबरला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Related Stories

सीमाप्रश्नी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी हुशारीने महाराष्ट्राची बाजू मांडावी

datta jadhav

सातारा : जिल्ह्यातील 51 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर सातारा येथील एका बाधिताचा मृत्यु

Archana Banage

मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? ; राज ठाकरेंचे भन्नाट उत्तर

Archana Banage

श्रीनगर येथे दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला

Archana Banage

एम्समध्ये वरिष्ठ सहकाऱ्यानं बलात्कार केल्याचा महिला डॉक्टरने केला आरोप

Archana Banage

राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची याच्यात अडकले – बाबा आढाव

Archana Banage