Tarun Bharat

”शिवसैनिकांच्या अंगावर जर कोणी याल खासकरुन शिवसेना भवनावर तर आहोत आम्ही गुंड”

मुंबई \ ऑनलाईन टीम

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन काल, बुधवारी भाजप युवा मोर्चाने शिवसेना भवनावर मोर्चा काढला. यानंतर शिवसैनिक आणि आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यानंतर भाजपने शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे तसेच शिवसेना गुंडगिरी करत असल्याचा आरोप होत आहे. या सगळ्या टीकांना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले की, शिवसेना गुंडगिरी करते परंतु सत्तेचा माज म्हणाल तर ते चुकीचं असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपच्या फटकार मोर्चात जर सत्तेचा माज दाखवला असता तर वेगळ्या पद्धतीचा राडा झाला असता. गुंडगीरी म्हणाल तर शिवसैनिकांच्या अंगावर जर कोणी याल खासकरुन शिवसेना भवनावर तर आम्ही गुंड आहोत. शिवसेना भवन राज्याच्या अस्मितेचं प्रतिक आहे. बाळासाहेब ठाकरे स्वतः त्या वास्तुमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करत होते त्या वास्तुच्या दिशेने कोणी चाल करत असेल तर आम्ही गुंड आहोत आणि हे सांगण्यासाठी आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टीफाईड गुंड आहोत महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत आम्ही गुंड आहोत. त्यावेळी गुंडगीरी केली म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आवाज आहे. तो आवाज दाबण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही गुंडगीरी दाखवू असे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.

विरोधी पक्षाचा आवाज बुलंद असला पाहिजे या मताचा आहेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या मताचे आहेत. आंदोलन करत असताना आमची जी श्रद्धास्थानं आहेत. अस्मितेच्या खुणा आहेत. त्याच्याकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर सहन होणार नाही महाराष्ट्र खवळून उठेल, शिवसेनाभवनासमोर आंदोलन करायचं नाही शिवसेना भवन हे अपवाद आहे. तसेच काल कुठेही महिलेवर हल्ला झाला असं मला वाटत नाही. महिलांनी अशा वेळी थोडं लांब थांबायला हवं. पुरुषांच्या अंगावर जाणं बरोबर नाही. भाजपमधल्याही अनेकांना या गोष्टी आवडलेल्या नाहीत, की कुणीतरी शिवसेना भवनावर जाऊन आंदोलन करत होतं. आंदोलनं करण्यासाठी वेगळ्या जागा खूप आहेत. एखादी गोष्ट पटत नसेल, तर तुम्हाला आंदोलन करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.

यासोबतच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वाढदिवसाविषयी देखील संजय राऊत यांना यावेळी विचारण्यात आले. ते म्हणाले की,
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा राजकारणातला अनुभव पाहिला तर या क्षणी ते राज्याचे वडिलधारे आहेत. त्यांना शुभेच्छा देणं हे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. राज्यपाल केंद्राचे दुत आहेत केंद्राच्या आदेशानुसार ते वागत असतील तरी राज्यातील घटनात्मक पद्धतीने त्यांना वागाव लागतं. वाढदिवसाला प्रत्येकवेळी शुभेच्छा देणाऱ्यानेच भेट आणि पुष्पगुच्छ द्यायाचा असं नाही, १२ आमदारांच्या नियुक्तीचा मंजुरीचा पुष्पगुच्छ राज्यपालांनी महाराष्ट्राला द्यावा अशी, आमची इच्छा असल्याचे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.

Related Stories

आता बार्शी पोस्ट ऑफिस देणार हयातीचा दाखला

Archana Banage

रस्त्यावरचा शिवसैनिक! संजय पवार आहेत तरी कोण?….

Rahul Gadkar

मान्सूनचा महाराष्ट्राला लवकरच अखेरचा सलाम

datta jadhav

कोरोना : महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.25 % वर

Tousif Mujawar

सरकारने आमदारांऐवजी गरजूंना घरं द्यावीत

datta jadhav

सीमाभागातील कन्नडसक्ती मोडून काढू!

Archana Banage