Tarun Bharat

शिवाजीराजे हायस्कूलचा शंभर टक्के निकाल

प्रतिनिधी /पणजी

गोवा शांलात मंडळाने 2020-21 सालच्या घोषित केलेल्या दहावी च्या निकालानुसार डिचोली तालुक्यातील खोलपेवाडी साळ येथील शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असून ग्रामीण भागात असूनही या विद्यालयाने आपली अज्वलतेची परंपरा कायम राखली आहे. कु. हनुमंत तुकाराम पेडणेकर यांने 91 टक्के (546) गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला. जय शिवराम नाईक याने 89.83 (539) गुण मिळवून द्वितीय क्रमांक, वैष्णवी राजेश प्रसादी हिने 89.50 टक्के (537) गुण मिळवून तृतीय तर गोपीनाथ सुनिल सांबारी याने 89.17 टक्के (535) गुण मिळवून चौथा क्रमांक मिळवला.

या विद्यालयातून एकुण 98 विद्यार्थी दहावीला होते. यात विशेष श्रेणीत 29 प्रथम श्रेणीत 32, द्वितीय श्रेणीत 33 तर पास श्रेणीत 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच इंग्लिश मध्ये 19, हिंदीमध्ये 44 मराठीत 36, गणितामध्ये 22, विज्ञानात 38, समाजशास्त्रामध्ये 21 विद्यार्थ्यंनी विशेष श्रेणीत गुण प्राप्त केले. लॅवेनिया लोबो, दिलीप देसाई, सुकन्या केणी, रुद्रेश नाईक, बाळकृष्ण गवस, शैलेश राऊत, शरदचंद्र गावस व मुख्याध्यापक नागनाथ गोसावी यांनी विशेष श्रम घेतले. हायस्कुलची चेअरमन व संस्थेचे संस्थापक पांडुरंग दत्ताराम राऊत, मुख्याध्यापक नागनाथ गोसावी, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष, विद्यालयाची व्यवस्थापन समिती, व्यवस्थापक दत्ताराम पां. राऊत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Stories

आयआयटीग्रस्तांच्या सर्व समस्या सोडविणार

Patil_p

शिवोलीतील बेकायदा गाळय़ांच्या बांधकाम सुरुच

Amit Kulkarni

हळर्ण पंचायतीच्या पंच सदस्याचा भाजप पक्षात प्रवेश ,प्रवीण आर्लेकर यांना पाठिंबा निवडून आणण्याचा निर्धार

Amit Kulkarni

संदीप परब बनले देवदूत..!

Amit Kulkarni

दिल्लीत देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ

Amit Kulkarni

आपले वर्तन समाजोपयोगी केल्यास देश बलशाली

Amit Kulkarni