Tarun Bharat

शिवाजीराव तुम्ही पूर्वी राष्ट्रवादीचेच होता..यापुढे सर्वांनी मिळून पक्ष वाढवा : खा.शरद पवार

शिराळा / वार्ताहर

भाजपाचे नेते माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून येत्या दोन एप्रिल रोजी पाडव्याच्या मुहूर्तावर शिराळ्यातील कार्यक्रमात त्यांचा रितसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे.

बुधवारी २ मार्च रोजी माजी मंत्री नाईक यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची मुंबई येथील यशवंतराव चव्हाण स्मृति सदन येथे भेट घेतली. त्या वेळी शरद पवार यांच्या सोबत झालेल्या चर्चेत नाईक यांचा राष्ट्रवादीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. गेल्या महिनाभरापासून शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीमध्ये होणारा प्रवेश हि चर्चा सर्वत्र सुरू होती. आज या चर्चेवर पुर्ण पणे पडदा पडला असुन शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादीमय झाले आहेत. यावेळी झालेल्या बैठकीत खासदार शरद पवार म्हणाले की, शिवाजीराव तुम्ही पूर्वी राष्ट्रवादी पक्षाचेच होता आता पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करत आहात. तुम्ही पुर्वी राष्ट्रवादी पक्षात झोकून काम केले आहे. यापुढे तुम्ही सर्वांबरोबर मिळून मिसळून काम करुन व पक्ष वाढीसाठी प्रयत्न करुया असे आव्हान त्यांनी केले.

माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, शिराळा विधानसभा मतदार संघाचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्याशी देखील चर्चा केली. त्यांच्यासमवेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, यशवंत उद्योगसमूहाचे चेअरमन रणधीर नाईक, यशवंत दूध संघाचे सत्यजित नाईक, शिवाजी केनचे अभिजीत नाईक आदी उपस्थित होते.

Related Stories

चिंताजनक : महाराष्ट्रात आत्तापर्यंत 15,591 पोलिसांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

स्थायी सभापती निवडीत राष्ट्रवादीकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम; भाजपाचे धीरज सुर्यवंशी विजयी

Archana Banage

देवराष्ट्रे ग्रामपंचायतवरील कारवाईचा प्रस्ताव फेटाळला

Archana Banage

पुणे विभागात ३८० स्टेशन मास्तर जाणार सामूहिक रजेवर

Archana Banage

..तर मिरजेतील व्यापारी शासकीय कार्यालयांमध्ये घुसणार

Archana Banage

भाजपच्या माजी मंत्र्याची गळा आवळून हत्या

datta jadhav
error: Content is protected !!