Tarun Bharat

शिवाजी विद्यापीठाचा ऑनलाईन दीक्षांत समारंभ मंगळवारी

राष्ट्रपती सुवर्णपदक सौरभ पाटील, कुलपती मेडल महेश्वरी गोळे

प्रतिनिधी / कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचा 57 वा दीक्षांत समारंभ 6 एप्रिल रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागातील व्दितीय वर्षाचा विद्यार्थी सौरभ पाटील राष्ट्रपती सुवर्ण पदक व कुलपती मेडल सातारच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी महेश्वरी गोळे हिला जाहीर झाले आहे. यंदा पहिल्यांदाच सुमारे 77 हजार 542 विद्यार्थी पदवी प्रमाणपत्र घेणार आहेत, अशी माहिती ऑनलाईन पत्रकार परिषदेत कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.

विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात मंगळवार 6 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने दीक्षांत समारंभ होणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान शाखा- 35 हजार 597, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखा- 21 हजार 927, मानव्यविद्या शाखा- 17 हजार 883 तर आंतरविद्या शाखा- 2135 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र पोस्टाने वितरित केली जाणार आहेत.

ऑनलाईन दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी यू-टुयबच्या लिंक विद्यापीठाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे, तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले आहे. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, आदी उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर जिल्हापरिषदेत सभापती निवडीत हातकणंगलेला डबल लॉटरी

Archana Banage

सातारा जिल्हय़ात प्रत्यक्ष उपचारार्थ फक्त 1 हजार 286 रुग्ण

Archana Banage

शिरोळ शहरात एकाच वेळी दोघांचा कोरोनाने मृत्यू

Archana Banage

सांगली : जतमध्ये तरुणाची आत्महत्या

Archana Banage

सांगली : संस्थानच्या गणपतीचे साधेपणाने विसर्जन

Archana Banage

दुर्गम भागातील शाळांची संख्या पुर्ववत करा अन्यथा तीव्र आंदोलन

Archana Banage
error: Content is protected !!