Tarun Bharat

शिवाजी विद्यापीठाचा 8.82 कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प सादर

प्रतिनिधी / कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचा 2021-22 या शैक्षणिक वर्षातील वार्षिक अर्थसंकल्पात 510.22 कोटीची रक्कम जमा आहे. 519.04 कोटीचा खर्च अपेक्षित होता. परंतू अधिसभा सदस्य ऍड. धैर्यशील पाटील यांनी 8.82 कोटी तुटीचा अर्थसंकल्प बुधवारी झालेल्या अधिसभेत सादर केला. ही तूट विद्यापीठ निधीतील शिलकीतून भरून काढली जाणार आहे. या अर्थसंकल्पात शैक्षणिक व संशोधनावर भरीव तरतूद केली आहे. सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याने अधिसभा सदस्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. अधिसभेत मांडलेल्या 68 ठरावांपैकी 34 मंजूर तर 34 ठराव मागे घेण्यात आले. अधिसभेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. सचिवपदी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

अॅड. धैर्यशील पाटील यांनी ऑनलाईन पध्दतीने मुद्देसुदपणे वार्षिक अर्थसंकल्पाचे सादरीकरण केले. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अर्थसंकल्प मांडल्याने अधिसभा सदस्यांवर त्याचा चांगलाच प्रभाव पडला. त्यांनी विधीमंडळाप्रमाणे मधून मधून केलेल्या शेरशायरीला एका सदस्यांनी शेरशायरीतच प्रश्न विचारल्यानंतर सभागृहात एकच हश्यांचे फवारे उडले. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे ऍड. पाटील यांनी दिली. अर्थसंकल्प सादरीकरणा दरम्यान विधीमंडळात असल्याच्या भावना सदस्यांकडून व्यक्त होत होत्या. प्रशासकीय विभागाकडून 38.80 कोटी, शास्त्र अधिविभागांकडून 3.40 कोटी, इतर अधिविभागांकडून 2.63 कोटी जमा होण्याची अपेक्षा आहे. इतर उपक्रमांमधून 25.61 कोटी असे एकूण 70.44 कोटी विद्यापीठाच्या स्वनिधीत जमा होणे अपेक्षित आहे. विद्यापीठाच्या संशोधन व विकास निधीतून 23.48 कोटी रक्कम घसारा निधीच्या शिल्लक रक्कमेतून 15.08 कोटी जमा होणे अपेक्षित आहे. प्रस्तावित खर्चामध्ये प्रशासकीय विभागाकडून 63.91 कोटी, शास्त्र अधिविभाग- 5.65 कोटी, इतर अधिविभाग- 5.16 कोटी, विविध सेवा व इतर उपक्रम 40.64 कोटी असा विद्यापीठाच्या स्वनिधीमधील 115.36 खर्च अपेक्षित आहे. वेतन अनुदान खर्च 129.74 कोटी, विविध वित्तीय संस्थांकडून मिळणाऱया निधीमधून खर्चासाठी 7.73 कोटी तसेच संशोधन व विकास निधी 23.48 कोटी व घसारा निधी 15.08 कोटी, निलंबन लेखे 227.65 कोटी अशी एकूण 519.04 कोटी रूपयांच्या खर्चासाठी तरतूद प्रस्तावित आहे. यासह अन्य गोष्टींमध्ये केलेल्या तरतुदीचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर डॉ. एस. डी.डेळेकर, स्वाती पंडीत, ईला जोगी, मधुकर पाटील, डॉ. राजेंद्र थोरात, ऍड. जगदीश पाटणे, संजय परमाने, डॉ. अरूण पाटील, डॉ. प्रताप पाटील आदींनी संशोधन, शैक्षणिक निर्णय, परीक्षा विभागातील प्रलंबित प्रश्न आदी विषयावर ठराव मांडले. सर्वच ठरावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यापीठ प्रशासन सकारात्मक असल्याने ठराव खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर, नामंजूर करण्यात आले.

अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे :
-संशोधनासाठी ग्रंथालय :2 कोटी 50 लाख
-विद्यार्थीनी वसतीगृह :1 कोटी 39 लाख
-विद्यार्थी वसतीगृह : 2 कोटी 66 लाख
-कमवा व शिका मुलींचे वसतीगृह: 10 लाख 50 हजार
-परदेशी विद्यार्थी वसतीगृह : 41 लाख
-रिसर्च स्कॉलर वसतीगृह: 25 लाख
-खेळ, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, शिबिरे: 10 लाख
-दिव्यांग सुविधा : 2 कोटी 25 लाख
-संगणक प्रणाली : 1 कोटी
संशोधन : 3 कोटी 91 लाख
-इमारत दुरूस्ती : 33 कोटी 94 लाख
-विद्यापीठ परिसर सुशोभिकरण : 1 कोटी
-ज्येष्ठ नागरिक: 3 लाख
-राजर्षी शाहू लोकविद्या व लोकसंस्कृती अभ्यास केंद्र: 3.65 लाख
-छत्रपती संभाजी महाराज रिसर्च सेंटर: 5 लाख

दुबार प्रमाणपत्र आणि गुणांमधील फेरफारीसंदर्भात कारवाई करा
दुबार प्रमाणपत्र दोशी आणि विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये फेरफार करणारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास एक महिन्याची मुदत अधिसभा सदस्यांनी दिली आहे. एक महिन्यानंतर संबंधितांवर गुन्हा नोंद न केल्यास अधिसभा सदस्य आंदोलन करतील, असा इशारा दिला.

Related Stories

कोल्हापूर-गारगोटी मार्गावर एसटी-ट्रक्टर अपघात, दोघे गंभीर

Archana Banage

कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची प्रकृती गंभीर

Archana Banage

नागाव येथे मारुती स्विफ्ट डिझायर कारची चोरी

Abhijeet Khandekar

महापालिकेचे बिगुल वाजणार की पुन्हा लांबणीवर

Archana Banage

Kolhapur; मिणचे सळीचोरी प्रकरणी तिघांना अटक; दोन दिवस पोलिस कोठडी

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : कळंबा येथे युवकाची आत्महत्या

Archana Banage