Tarun Bharat

शिवाजी विद्यापीठाला नॅकचे ‘ए प्लस प्लस’ मानांकन

प्रतिनिधी / कोल्हापूर

राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषद (नॅक)चे शिवाजी विद्यापीठाला ए प्लस प्लस मानांकन मिळाले आहे. ही घोषणा बुधवारी दुपारी करण्यात आली असून विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिध्द झाली आहे.

नॅक पिअर कमिटीचे अध्यक्ष प्रा. जे. पी. शर्मा यांच्यासह सदस्य प्रा. बी. आर. कौशल, प्रा. एस. ए. एच. मोईनुद्दिन, प्रा. तरुण अरोरा, प्रा. सुनील कुमार व प्रा. हरिश चंद्रा दास यांनी 15 ते 17 मार्च दरम्यान विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन पूर्ण केले. 70 टक्के संख्यात्मक माहिती अगोदरच नॅकला ऑनलाईन सादर केली होती. 30 टक्के गुणांसाठी प्रत्यक्ष पाहणी, चर्चा करून कुलगुरू, प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, आजी-माजी विद्यार्थी, कर्मचारी यांच्याशी चर्चा केली. या कमिटीने विशेष म्हणजे विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, अभ्यासक्रम, अध्ययन, अध्यापन, संशोधनाचा दर्जा अतिउच्च पातळीचा असल्याचा अहवाल नॅक बेंगलोर कार्यालयाला सादर केला होता.

या अहवालावर पुढील प्रक्रिया पूर्ण करून नॅक बेंगलोरने बुधवारी दुपारी 3.52 सीजीपीएमसह ए प्लस प्लस मानांकन मिळाल्याचे जाहीर केले आहे. नॅकचे ऑनलाईन पत्र विद्यापीठाला कळताच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नॅक ए प्लस प्लसची घोषणा झाल्याचे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. त्यामुळे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह सर्व अधिकाऱयांवर फोनव्दारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रत्येकाच्या सहकार्यातून नॅकचे ए प्लस प्लस मानांकन

विद्यापीठातील प्रत्येक घटकाने निष्ठेने काम केल्याने नॅकचे ए प्लस प्लस मानांकन मिळाले आहे. माझ्या कुलगुरू पदाच्या कारकिर्दित पहिल्यांदाच ऐवढे मोठे यश मिळाल्याने मला खूप आनंद आहे. येथून पुढेही विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार.- कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के शिवाजी विद्यापीठ

Related Stories

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पालिकेत 54 जण लेट लतिफ

Patil_p

बालिंगा पंपिंग स्टेशनमध्ये अद्यावत मशिनरी

Archana Banage

कोल्हापूर : नेसरी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Archana Banage

उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना CBI कडून क्लीन चिट

datta jadhav

कोल्हापूरमध्ये जम्बो कोविड सेंटर उभे करावे

Archana Banage

सीमा बांधवांच्या समर्थनात करवीर तालुक्यातील शिवसैनिक उतरले मैदानात

Archana Banage
error: Content is protected !!