Tarun Bharat

शिवानी भोसले यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर

वार्ताहर/ कोगनोळी

जिल्हा पंचायत सदस्या शिवानी विजयसिंह भोसले यांच्या सामाजिक सेवेची दखल घेत नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन-बेळगाव व हेल्पलाईन नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांच्यावतीने आंतरराज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. आदर्श हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पोलीस स्टेशन जवळ वडगाव, बेळगाव येथे रविवार दि. 28 मार्च 2021 रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

 गौरव पुरस्कार मेडल, विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व म्हैसूर फेटा असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्कार वितरण सोहळय़ासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिनेकलाकार, शिक्षण अधिकारी, राजकीय नेते व मठाधीश उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी केंद्रीयमंत्री रत्नमाला सावनूर, बेळगावचे माजी खासदार, बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी खासदार व ब्रिगेडीयर इंडियन आर्मी मुंबईचे सुधीर सावंत, मेट्रो हायटेक कोल्हापूरचे चेअरमन सुरेशदादा पाटील, ऍड. अनिल शिंदे व मनोहर वडर यांनी दिली.

Related Stories

निर्जंतुकीकरण कोठडी नागरिकांसाठी धोकादायक

Patil_p

मजगाव येथील मटकाबुकी तडीपार

Amit Kulkarni

जिल्हय़ात 6 हजार हेक्टरात हळद लागवड

Omkar B

पावसाचा जोर वाढला की हृदयाची धडधडही वाढतेय….

Patil_p

कोरोना प्रतिबंधक लस देण्यात बेळगाव जिल्हा दुसऱयास्थानी

Patil_p

प्रश्न पडणे अन् त्यासाठी भूमिका घेणे आवश्यक

Patil_p