Tarun Bharat

शिवेंद्रसिंहराजे-अजित पवार यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

ऑनलाईन टीम / सातारा : 

भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मतदारसंघातील कामांच्या संदर्भात ही भेट घेतल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले असले तरी या भेटीवरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

बारामती येथील व्हीआयआयटी येथे सकाळी शिवेंद्रसिंहराजे आणि अजित पवार यांच्यात 15 मिनिटे बंद खोलीत चर्चा झाली. भेटीनंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघातील कामांसाठी ही भेट घेतल्याचे सांगत माध्यमांना टाळले. मात्र, आगामी जिल्हा मध्यवर्ती बँकेची आणि सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे सांगण्यात येते.

शिवेंद्रसिंहराजे-अजित पवार यांच्यातील ही तिसरी भेट होती. यापूर्वीही शिवेंद्रसिंहराजे यांनी पुणे, मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमधील जवळीक वाढू लागल्याने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

Related Stories

शुक्रवारी ‘गप्पा कोविडायन’च्या…

datta jadhav

सातारा : आशा सेविकांच्या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

Archana Banage

जिल्ह्यात केवळ एक बाधित

datta jadhav

सातारा : कोथिंबीर झाली ३० रुपयाला पेंडी तर अंडी ८५ रुपये डझन

Archana Banage

महाबळेश्वर शहर झाले कोरोना मुक्त

Patil_p

शेतकऱ्यांनो 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी नको

datta jadhav