Tarun Bharat

शुक्रवारपेठ टिळकवाडीत सांडपाणी रस्त्यावर

प्रतिनिधी / बेळगाव

शुक्रवारपेठ, टिळकवाडी येथे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. सांडपाणी रस्त्यावरून वाहून परिसरात साचल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनचालकांवर सांडपाणी उडत आहे. सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असल्याने याची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहेत.

कलामंदिर येथे काम सुरू असल्याने सांडपाण्यासाठी घालण्यात आलेली वाहिनी कचरा साचून रस्त्यावरून पाणी वाहत असल्याची शक्मयता वर्तविली जात आहे. एकीकडे शहरात सर्वत्र स्वच्छता केली जात असताना दुसरीकडे मात्र अशाप्रकारे दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. शहराच्या महत्त्वाच्या भागात अशाप्रकारे सांडपाणी रस्त्यावरून पसरत असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

दुरुस्ती करण्याची मागणी

स्वरूप प्लाझासमोरच रस्त्यामधून मोठय़ा प्रमाणात सांडपाणी बाहेर पडत आहे. शुक्रवारपेठ परिसरात हे पाणी पसरत आहे. याबद्दल तक्रार करूनदेखील अद्याप याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या डेनेजची लवकर दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

Related Stories

रिया खोत हिचा अमेरिकेत पुरस्कार देऊन गौरव

Patil_p

कंकणवाडीजवळ कासव विकणाऱया तरुणाला अटक

Tousif Mujawar

नमोंच्या नेतृत्वात देश प्रगतीकडे

Amit Kulkarni

आरपीडी महाविद्यालयाला नॅककडून ‘ए मानांकन’

Amit Kulkarni

खानापूर को-ऑप. बँक निवडणुकीत मारुती पाटील विजयी

Amit Kulkarni

शुक्रवारी पावणे दोनशे कोरोनाचे नवे रुग्ण

Amit Kulkarni