Tarun Bharat

शुक्रवारीही बाधितांपेक्षा बरे होणाऱयांची संख्या दुप्पट

608 जण झाले कोरोनामुक्त, 317 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, 7 जण दगावले

@ प्रतिनिधी/ बेळगाव

शुक्रवारी बाधितांपेक्षाही बरे होणाऱयांची संख्या दुप्पट झाली आहे. दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 608 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. तर 317 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 12 हजार 54 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव तालुक्मयातील 112 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये शहर व उपनगरांतील 79, ग्रामीण भागातील 33 जणांचा समावेश आहे. शुक्रवारी एकूण बाधितांची संख्या 15 हजार 900 च्या घरात पोहोचली आहे.

शिंदोळी, बेळगाव, खानापूर, हुक्केरी, रामदुर्ग, कोल्हापूर येथील एकूण सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांचा सरकारी आकडा 235 वर पोहोचला आहे. प्रत्यक्षात हा आकडा अधिक आहे. मात्र बाधितांपेक्षा बरे होणाऱयांची संख्या अधिक आहे. सध्या 3 हजार 574 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

आणखी 388 जणांचे अहवाल यायचे आहेत. हिंडलगा, हिरेबागेवाडी, सरस्वतीनगर, उचगाव, अष्टे-चंदगड, गणेशपूर, सुळगा-हिंडलगा, तुरमुरी, सांबरा, निलजी, मुतगा, बापट गल्ली, कॅम्प, टिळकवाडी, हिंदवाडी, वडगाव, धामणे, जयनगर-हिंडलगा, हुंचेनट्टी, लक्ष्मी टेकडी, राणी चन्नम्मानगर, आदर्शनगर-वडगाव परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

शास्त्राrनगर, हनुमाननगर, कपिलेश्वर कॉलनी, मारुती गल्ली-अनगोळ, सह्याद्रीनगर, कामत गल्ली, कनकदासनगर-वडगाव, वर्धाप्पा गल्ली, भाग्यनगर, रामदेव गल्ली-वडगाव, मारुती गल्ली-खासबाग, हिंदूनगर, कावेरीनगर-मंडोळी रोड, शाहूनगर, काँग्रेस रोड, बसव कॉलनी, नाथ पै सर्कल, सदाशिवनगर, गांधीनगर, वैभवनगर, शेरी गल्ली, काळी आमराई, कुमारस्वामी लेआऊट, कल्लेहोळ, विश्वेश्वरय्यानगर, काकतीवेस रोड, शांतीनगर-टिळकवाडी, खडेबाजार-शहापूर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

एटीएसमधील आणखी 17 जणांना कोरोना

सांबरा येथील एअरफोर्स प्रशिक्षण केंद्रातील आणखी 17 प्रशिक्षणार्थींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. चार दिवसांपूर्वी एकाच दिवशी 150 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली होती. शुक्रवारी आणखी 17 जणांना लागण झाली आहे.

Related Stories

बेळगाव जिल्हय़ात पाच उपआरटीओ कार्यालये

Patil_p

सीमाप्रश्न लवकरात लवकर निकालात काढा

Patil_p

खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेप

Patil_p

जिल्हय़ातील 1 लाखांहून अधिक शेतकऱयांना नुकसानभरपाई

Amit Kulkarni

देवी सजली, रात्र जागली

Amit Kulkarni

अतिवाड फाटय़ावर वाहनधारकांची कसून चौकशी

Amit Kulkarni