Tarun Bharat

शुक्रवारी कोरोनाचे 49 नवे रुग्ण आढळले

चिकोडी येथील महिलेसह दोघा जणांचा मृत्यू

प्रतिनिधी/ बेळगाव

शुक्रवारी जिल्हय़ातील आणखी 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चिकोडी तालुक्मयातील एक 63 वषीय वृद्ध व 75 वषीय वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनावर मात केलेल्या 30 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजवरचा मृतांचा आकडा 880 वर पोहोचला आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 78 हजार 721 वर पोहोचली आहे. त्यापैकी 77 हजार 415 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या 426 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये  उपचार करण्यात येत आहेत.

अद्याप 3 हजार 603 जणांचे अहवाल यायचे आहे. गुरुवारी बेळगाव तालुक्मयात 19, चिकोडी तालुक्मयात 14, अथणी तालुक्मयात 6, गोकाक तालुक्मयात 4, हुक्केरी तालुक्मयात 3 तर रामदुर्ग, रायबाग, बैलहोंगल तालुक्मयात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. सौंदत्ती व खानापूर तालुक्मयात एकही रुग्ण आढळला नाही.

हिंदवाडी परिसरातील एकाच कुटुंबातील चौघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. अळवण गल्ली-शहापूर, कॅम्प पोलीस ठाणे, जाधवनगर, महांतेशनगर, रामनगर, सह्याद्रीनगर, विजयनगर, विनायकनगर, टी. व्ही. सेंटर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून एका खासगी डॉक्टरचाही यामध्ये समावेश आहे.

Related Stories

कंग्राळी बुद्रुकला महिलास्नेही पुरस्कार प्रदान

Amit Kulkarni

युवा कीर्तनकाराचा आवाज पोहोचला मुंबई दरबारी

Amit Kulkarni

कोरोना फैलाव वाढलेल्या गावांना जिल्हाधिकाऱयांची भेट

Amit Kulkarni

बसवण कुडचीत आंबील गाडय़ांची मिरवणूक

Amit Kulkarni

पिंक बससेवेकडे महिलांची पाठ

Patil_p

चैतन्यमय वातावरणात बाप्पांचे आगमन

Amit Kulkarni
error: Content is protected !!