Tarun Bharat

शुक्रवारी कोरोनामुळे वृद्धासह दोघे जण दगावले

सक्रिय रुग्ण संख्येने पार केला 500 चा आकडा

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना महामारीमुळे शुक्रवारी दिवसाभरात दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक 65 वषीय वृद्ध व 28 वषीय तरुणाचा समावेश आहे. एकूण मृतांचा आकडा 347 वर पोहोचला असून गेल्या आठवडय़ाभरात चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात कोरोनाचे 70 नवे रुग्ण दाखल झाले असून सक्रिय रुग्ण संख्येनेही 500 चा आकडा पार केला आहे.

सांबरा एटीएसमध्ये शुक्रवारी आणखी 20 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुरुवारी एटीएस व नॉन टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटमधील 35 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दुसऱया दिवशी आणखी 20 जणांची भर पडली आहे. या परिसरातील एकूण रुग्ण संख्या 55 वर पोहोचली आहे.

अनंतशयन गल्ली, टिळकवाडी, भाग्यनगर, कॅम्प, चिदंबरनगर, क्लब रोड, हनुमाननगर, जेएनएमसी हॉस्टेल, कोतवाल गल्ली, माळमारुती, नानावाडी, वडगाव, वंटमुरी कॉलनी, विजयनगर परिसरात नवे रुग्ण आढळून आले आहेत. हिंदवाडी येथील एकाच कुटुंबातील चौघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून सदाशिवनगर परिसरातही सक्रिय रुग्ण संख्या वाढली आहे.

मणगुत्ती, गोकाक, अथणी, औरादी, चिकोडी, हारुगेरी, हिडकल डॅम, कुडची, करोशी, कोन्नूर, फरिदखानवाडी, सदलगा, परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 27 हजार 937 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 27 हजार 32 जणांनी कोरोनावर मात केली असून सक्रिय रुग्णसंख्या 531 वर पोहोचली आहे. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहे.

अद्याप जिल्हय़ातील 36 हजार 745 जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत 6 लाख 9 हजार 229 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 75 हजार 497 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. वेगवेगळय़ा प्रयोग शाळेतून 2 हजार 538 जणांचा अहवाल यायचा आहे. शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 19 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

खबरदारी घेण्याचे आवाहन एकीकडे बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे कोरोना रुग्ण संख्येत झपाटय़ाने वाढ होत चालली असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बेळगावातही कडक निर्बंध जारी करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने लसीकरणाचा वेग वाढविला आहे. गेल्या आठवडय़ाभरात मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून प्रत्येकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

कर्नाटक-गोवा बससेवेला प्रारंभ

Patil_p

सावधान.. हलगा गावातील पाणी बनले दूषित!

Amit Kulkarni

जिल्हय़ात सोमवारी 2100 रुग्ण कोरोनामुक्त

Omkar B

स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार

Patil_p

मधमाशांच्या हल्ल्यात तीन महिला जखमी

Amit Kulkarni

प्रलंबित कामांसाठी तातडीने प्रयत्न करण्यावर भर द्या

Omkar B