Tarun Bharat

शुक्रवारी पावणे दोनशे कोरोनाचे नवे रुग्ण

बेळगावात 105 जण बाधित, आरोग्य विभागाने वाढविली तपासणी : दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येने धोका वाढला

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव शहर व उपनगरांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी संपूर्ण जिह्यात 175 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यापैकी 105 जण एका बेळगाव शहरातील आहेत. सक्रिय रुग्ण संख्याही 771 वर पोहोचली असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे.

जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 28 हजार 489 वर पोहोचली असून आतापर्यंत 27 हजार 378 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 353 जण दगावले आहेत. अद्याप 37 हजार 132 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. तर 2 हजार 840 हून अधिक जणांची स्वॅब तपासणी अहवाल यायची आहे.

शुक्रवारी सांबरा एटीएसमधील 3, तोराळी (ता. खानापूर) येथील सीआरपीएफच्या 2 जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठातील दोघा जणांना कोरोनाची लागण झाली असून चार बँक कर्मचाऱयांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

शुक्रवारी कलखांब, कंग्राळी खुर्द, कर्ले, मच्छे, मुचंडी, मुतगा, निलजी, पिरनवाडी, होनगा, आनंदनगर-वडगाव, अंजनेयनगर, आझाद गल्ली, कुमारस्वामी लेआऊट, भाग्यनगर, कॅम्प, चन्नम्मानगर, चिदंबरनगर, गुरुप्रसाद कॉलनी, हनुमाननगर, हिंडलगा, हिंदवाडी, जयनगर, शहापूर, कुवेंपूनगर, महांतेशनगर, शाहूनगर, शास्त्राrनगर, शिवबसवनगर, शिवाजीनगर, श्रीनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

टी.व्ही.सेंटर, सुभाषनगर, वंटमुरी कॉलनी, वैभवनगर परिसरातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून टिळकवाडी परिसरात रुग्णसंख्या वाढती आहे. गोडसेवाडी, अनगोळ, गोजगा, मृत्यूंजयनगर, नेहरुनगर, जुनेबेळगाव, जुने गांधीनगर, रामतीर्थनगर, सदाशिवनगर परिसरातही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

अंकलगी, अथणी, बैलहोंगल, बेनचिनमर्डी, चिंचली, दरुर, हळ्ळूर, गोकाक, दासनट्टी, खानापूर, अंकली, हुक्केरी, कब्बूर, काडापूर, कागवाड, कल्लोळी, कटगेरी, करगांव, कावळेवाडी, कोकटनूर, चिकोडी, पाश्चापूर, सौंदत्ती, उगारखुर्द, उप्पारट्टी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

बेळगावात तपासणी वाढविली…

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना कोरोनाची लागण झाली आहे. पोटनिवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री दोन दिवस बेळगावात होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वास्तव्य केलेले हॉटेल व त्यांनी प्रचारात भाग घेतलेल्या भागात शुक्रवारी आरोग्य विभागाने तपासणी वाढविली आहे. सांबरा विमानतळ, खासबाग, मुतगा, सांबरा आदी मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा व रोडशो झालेल्या ठिकाणी स्वॅब तपासणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांच्या सूचनेवरून आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी हाती घेतल्याचे जिल्हा सर्वेक्षण अधिकारी बालकृष्ण तुक्कार यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आलेले लोकप्रतिनिधी, नेते व नागरिकांनीही तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. मुख्यमंत्र्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने काही राजकीय नेत्यांनी स्वतःहून क्वारंटाईनमध्ये राहणे पसंत केले  आहे.

Related Stories

तिलारी नदीत बुडून बेळगावच्या युवकाचा मृत्यू

Amit Kulkarni

‘महेश काळे’ यांच्या गायन मैफलीला रसिकांचा लक्षणीय प्रतिसाद

Rohit Salunke

मंगळवारी 47 जण कोरोनामुक्त तर 30 जणांना लागण

Patil_p

तक्रारी निवारण्यासाठी समिती नेमा

Amit Kulkarni

रेशनकार्डसाठी पुन्हा सप्टेंबरमध्ये ई-केवायसी

Amit Kulkarni

आणखी एका ग्राहकाचे 1 लाख 60 हजार लांबविले

Patil_p