Tarun Bharat

शुक्रवारी 959 रुग्ण झाले कोरोनामुक्त

792 नवे रुग्ण, 6 जणांचा मृत्यू : ग्रामीण भागात स्वॅब तपासणी वाढविण्याची सूचना

प्रतिनिधी / बेळगाव

शुक्रवारी पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात जिल्हय़ातील 959 जणांनी कोरोनावर मात केली असून 792 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आजवरच्या मृत्यूच्या सरकारी आकडय़ाने 600 टप्पा पूर्ण केला आहे.

जिल्हय़ातील बाधितांचा आकडा 70 हजारांच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. आजवर 69 हजार 413 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत 56 हजार 696 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार अद्याप 12 हजार 114 सक्रिय रुग्ण आहेत. मृतांचा आकडा 603 वर पोहोचला आहे.

गेल्या 15 ते 20 दिवसांपासून रोज 1 हजारावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. दोन दिवसांपासून रुग्णसंख्येत किंचित घट होत चालली आहे. ग्रामीण भागातही स्वॅब तपासणी वाढविण्यात आली आहे. शुक्रवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा बेळगाव दौऱयावर आले होते. तपासणी वाढविण्याची सूचना त्यांनी अधिकाऱयांना केली आहे.

हुलीकट्टी, अगसगा, आंबेवाडी, सांबरा, हिरेबागेवाडी, बसरीकट्टी, बेन्नाळी-होनगा, बिजगर्णी, येळ्ळूर, गौंडवाड, गुरामट्टी, हंदिगनूर, हिंडलगा, केदनूर, निलजी, शिंदोळी, बडस के. एच., सुळेभावी, मोदगा, विजयनगर, विश्वेश्वरय्यानगर, टिळकवाडी, उद्यमबाग, आनंदनगर-वडगाव, वैभवनगर, यमनापूर, कोरे गल्ली-शहापूर, संगमेश्वरनगर, अंजनेयनगर, नेहरुनगर, बसवणकुडची, पोलीस हेडक्वॉर्टर्स परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

रामतीर्थनगर, श्रीनगर, वंटमुरी कॉलनी, किणये, काळी आमराई, कनकदास कॉलनी-अनगोळ, महांतेशनगर, महात्मा फुले रोड, महाद्वार रोड, खासबाग, नार्वेकर गल्ली-शहापूर, चौगुलेवाडी, राणी चन्नम्मानगर, रिसालदार गल्ली, भाग्यनगर, हिंदवाडी, शाहूनगर, शास्त्राrनगर, शेरी गल्ली, सुभाषनगर, ताशिलदार गल्ली, तानाजी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, आझमनगर, कॅम्प, चव्हाट गल्ली, चिदंबरनगर, गुरूप्रसाद कॉलनी, वंटमुरी जनता प्लॉट परिसरातही नवे रुग्ण आढळून आले आहेत.

13 वाहने जप्त, 95 जणांवर दंडात्मक कारवाई

शुक्रवारी सकाळपासून शहर व उपनगरांमध्ये विकेंड लॉकडाऊन सुरू झाला आहे. सोमवारी सकाळपर्यंत हे लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊनच्या काळात अनावश्यकपणे फिरणारी 13 वाहने जप्त करण्यात आली आहेत तर विनामास्क फिरणाऱया 95 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुतगा व कॅम्प येथील दोन दुकानदारांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी सांगितले.

Related Stories

आरोग्यवंत समाजनिर्मितीत केएलईचे मोठे योगदान

Amit Kulkarni

वैद्यकीय कचऱयाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न गंभीर

Amit Kulkarni

भिंतीवर साकारले शिवरायांचे चित्र

Patil_p

टीव्ही सेंटरमधील बेळगाव-वनमध्ये चोरी

Patil_p

निपाणीत हजारो शिवप्रेमींचा मूकमोर्चा

Amit Kulkarni

काँग्रेसकडून सतीश जारकीहोळींना तिकीट

Patil_p