Tarun Bharat

शुक्रवार पेठेतील रस्त्याची दुरवस्था

प्रतिनिधी /बेळगाव

शहरातील विविध भागात विविध वाहिन्या तसेच गॅस वाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आता ठिकठिकाणी रस्त्याची खोदाई करण्यात येत आहे. शुक्रवार पेठेतील रस्त्यावर ड्रेनेज वाहिन्या व चेंबर बांधण्यात आले असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर खोदण्यात आलेले खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे. टिळकवाडी परिसरात चौवीस तास पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी खोदाई सत्रास प्रारंभ करण्यात आला आहे. रस्ता खोदाई केल्यानंतर स़ुरक्षेच्यादृष्टीने बॅरिकेडस् लावण्यात येत आहेत. तसेच डेनेज वाहिन्या घालण्यात येत आहेत. शुक्रवार पेठेत ड्रेनेज चेंबर बांधण्यात आले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालत जाणे मुश्किल बनले आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना जलवाहिन्या घालण्यासाठी रस्त्याशेजारी पेव्हर्स ब्लॉक घालण्यात आले आहेत. त्यामुळे खोदण्यात आलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत व रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.

Related Stories

येळ्ळूर परिसरात भातांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव

Patil_p

हिरेबागेवाडीतील तरुणाला कोरोनाची लागण

Patil_p

डॉ. के. त्यागराजन बेळगावचे नवे पोलीस आयुक्त

Patil_p

प्रभूनगरजवळ एक टन तांदूळ जप्त

Omkar B

स्वच्छता करा,अन्यथा मनपाला कचरा भेट देवू

Patil_p

विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन उत्साहात

Amit Kulkarni