Tarun Bharat

शुभम शेळके यांचा उत्तर मतदासंघात प्रचार

मराठी बहुल भागात जल्लोषात स्वागत

प्रतिनिधी / बेळगाव

मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी शुक्रवारी उत्तर मतदार संघात जोरदार प्रचार केला. भगवे फेटे व भगवे झेंडे घेऊन युवकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. मराठी बहुल भागात करण्यात आलेल्या प्रचारावेळी नागरिकांनीही शेळके यांना मोठा प्रतिसाद दिला. सिंह चिन्हासमोरील बटण दाबून म. ए. समितीला विजयी करण्याचे आवाहन यावेळी मतदारांना केले

शुक्रवारी हेमू कलानी चौकापासून प्रचाराला सुरूवात करण्यात आली. पाटील मळा, मुजावर गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज रोड, कांगली गल्ली, पाटील गल्ली, फुलबाग गल्ली, ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, समर्थ नगर, महाद्वार रोड, संभाजी गल्ली, रामा मेस्त्राr अड्डा, तांगडी गल्ली येथे सांगता झाली. या प्रचार फेरीवेळी माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी तसेच म. ए. समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

मारिहाळ गावच्या सुपुत्राची बाजी

Patil_p

मास्क : कोरोना रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय

Patil_p

कॅन्टोन्मेंट बोर्डवर उद्यापासून प्रशासकीय राजवट

Amit Kulkarni

हिंडलगा महालक्ष्मी यात्रा गाव मर्यादित करण्याचा निर्णय

Amit Kulkarni

शहर परिसरात चौथा सोमवारही भक्तीभावाने साजरा

Amit Kulkarni

बेळगावच्या भाविकांनी पंढरपूरला जाऊ नये

Omkar B