Tarun Bharat

शुभम शेळके यांच्या प्रचारात खानापूर म.ए.समितीचा सहभाग

वार्ताहर / खानापूर

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांनी बेळगाव भागातील अनेक गावात उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारामध्ये सहभाग घेतला. गुरुवारी दिवसभर बेळगाव तालुक्मयाच्या कल्लेहोळ, तुरमुरी आदी भागात शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ खानापूर म. ए. समितीच्या पदाधिकाऱयांनी सहभाग घेतला
होता.

या भागातील आपल्या पै पाहुण्यांच्या गाठीभेटी घेऊन समिती उमदेवार शुभम शेळके यांना भरघोस मतांनी निवडून आणावे, अशी  विनंती
केली.

शेळकेंना विजयी करण्याचे आवाहन

  या प्रचारात मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील म. ए. समिती खानापूर, चिटणीस गोपाळराव देसाई कार्यकारिणी सदस्य, संभाजीराव देसाई कापोली, पी. एच. पाटील क-नंदगड, निरंजन सरदेसाई, रणजीत पाटील ग्रा. पं. सदस्य हलगा, विनायक सावंत उपसचिव म. ए. समिती, राजाराम देसाई, अजित पाटील गर्लगुंजी, ज्ञानेश्वर मेरवा हलसाल, हणमंत खटावकर यांनी सहभाग घेऊन सुळगा, तुरमुरी, मण्णूर, आंबेवाडी, गोजगा, उचगाव, कल्लेहोळ भागामध्ये प्रचार करून शुभम शेळके यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

वाहतूक पोलीस हवालदाराचा हृदयाघाताने मृत्यू

Patil_p

रेशन वितरणात बेळगाव जिल्हा प्रथम

Amit Kulkarni

सरस्वती वाचनालयात श्रावण संगीत महोत्सव

Patil_p

सांबरा महादेवनगरातील रस्ता दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

विमानतळासाठी अथणीत हालचाली

Amit Kulkarni

विमा रक्कम खात्यावर तातडीने जमा करा

Amit Kulkarni