Tarun Bharat

शुभम शेळके यांना निवडून आणण्याचा धामणे येथे निर्धार

Advertisements

वार्ताहर / धामणे

महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या लोकसभा पोटनिवडणूक प्रचारार्थ धामणे, ब्रह्मलिंगहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी भागात झंझावाती प्रचार झाला. यावेळी शुभम शेळके यांना प्रचंड मतांनी मतदान करून निवडून आणण्याचा निर्धार या भागातील मराठी मतदारांनी केला.

रविवारी रात्री 8.30 वाजता धामणे बसवाण गल्ली म. ए. समितीचे लोकसभा उमेदवार शेळके यांचे आगमन होताच फटाक्मयांची आतषबाजी करण्यात आली. बसवाण्णा मंदिर आवारात आयोजित जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी सोमाण्णा पाटील होते.

शुभम शेळके बोलताना म्हणाले, येत्या 17 एप्रिल रोजी होणाऱया लोकसभा पोटनिवडणुकीत मध्यवर्ती म. ए. समितीने मला उमेदवारीची संधी दिली आहे. धामणे भागातील सर्व युवकांनी म. ए. समितीला विजयी करून मराठी माणसाची एकजूट दाखवून द्यावी.

याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माजी महापौर सरिता पाटील, ग्रा. पं. सदस्य एम. के. पाटील, यल्लाप्पा रेमाणाचे, बाळू केरवाडकर, किरण चतुर, आप्पाजी डुकरे, मदन बामणे, भागोजी पाटील तसेच कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील सर्व मराठी बांधव, सर्व मराठी युवक मंडळांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

एलआयसीतर्फे विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप

Amit Kulkarni

आरसीयुसमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन

Patil_p

शाळांमध्ये प्रेम होण्याच्या घटना धोकादायक

Amit Kulkarni

शेषगिरी कॉलेज येथे केएलई संस्थेचा स्थापना दिन साजरा

Amit Kulkarni

उद्यमबाग रस्त्यावर पावसाचे पाणी

Omkar B

मुतगा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पालक-बालक मेळावा

Patil_p
error: Content is protected !!