Tarun Bharat

शेंद्रनजिक ट्रक अपघातात दोन ठार

500 कोंबडय़ाही मृत – चालक गंभीर जखमी

प्रतिनिधी/ सातारा

शेंद्रे (ता. सातारा) गावानजिक हॉटेल सातबारासमोर मंगळवारी रात्री मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कोंबडय़ा घेवून निघालेल्या आयशर टेम्पो व ट्रकचा भीषण अपघात होवून आयशर टेम्पोतील उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले दोन सहप्रवासी जागीच ठार झाले तर 500 कोंबडय़ाही मृत झाल्या आहेत. चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील शेंद्रे गावाजवळ हॉटेल सातबारासमोर दि. 7 रोजीच्या मध्यरात्री कोंबडय़ा घेऊन पुण्याचा दिशेने निघालेल्या आयशर टेम्पो (क्रमांक एम. एच. 01 सीयू 9424) ने समोरील माल ट्रक क्रमांक एम. एच. 12 एन एक्स 2914 ला मागील बाजूस जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती आयशर टेम्पोमधील सहप्रवासी साहेब खान व इम्तियाज खान (दोघे रा. उत्तरप्रदेश) हे दोघेही जागीच ठार झाले. तर चालक नफिस खान (रा. उत्तरप्रदेश) हा गंभीररित्या जखमी झाला आहे.

रुग्णवाहिका चालकाचे प्रसंगावधान

दरम्यान याच वेळी साताऱयातील जम्बो कोविड सेंटर येथे रुग्णास सोडून  अब्दुल सुतार नागठाणे (ता. सातारा) हे त्यांची रुग्णवाहिका घेवून नागठाण्याच्या दिशेने निघाले होते. त्यांना महामार्गावर ट्रक आणि आयशर टेम्पोचा अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी तातडीने शेंद्रे पुलाखालून वळसा मारून अपघातस्थळी धाव घेतली. यावेळी आयशर टेम्पोमधील दोन प्रवासी जागीच ठार झाल्याचे दिसले तर ड्रायव्हर गंभीर जखमी असल्याचे दिसल्याने अब्दूल सुतार यांनी कठोर परिश्रम करून चालक व मृत व्यक्तींना बाहेर काढले.

गंभीर जखमी टेम्पो चालकास स्वतःच्या रुग्णवाहिकेत घालून त्यांनी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे पोलिसांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचा चालक घटना स्थळावरून पळून गेला आहे. तर या भीषण अपघातात आयशर टेम्पोचा समोरील भागाचा चक्काचुर झाला होता. यामध्ये टेम्पाचे दीड लाखाचे तर मालट्रकचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी आयशर टेम्पो चालक नसीफ जुम्मन खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल सुतार यांनी याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हवालदार राजू मुलाणी अपघाताच अधिक तपास करत आहेत.

Related Stories

24 बॅटरी चोरटय़ाने चोरल्या

Patil_p

‘अजितदादांनी माझे विचार रुजवण्यासाठी दौरे करावेत’

Archana Banage

ग्रीन स्कुलमुळे आनंददायी शिक्षण मिळेल

Archana Banage

संदीप देशपांडेंवर कारवाई करण्याचे गृह राज्यमंत्र्यांचे आदेश

Archana Banage

वारणा धरणात १७.४३ टीएमसी पाणीसाठा

Archana Banage

35 मोबाईल चोरणारा अल्पवयीन चोरटा जेरबंद

Patil_p