Tarun Bharat

शेअरबाजारात पुन्हा कोरोना प्रभावामुळे घसरण

जागतिक शेअरबाजारावर परिणाम, गुंतवणूकदार कोंडीत

वृत्तसंस्था / मुंबई

कोरोना प्रभावामुळे नव्या आठवडय़ाचा शेअरबाजरांचा प्रारंभ नकारात्मक झाला आहे. जागतिक शेअरबाजारांच्या घसरणीचाही परिणाम भारतीय शेअरबाजारांवर झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारी दिवसअखेर मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 469.60 अंकांनी घसरून 30,690.02 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाचा निर्देशांक निफ्टी दिवअखेर 118.05 अंकांच्या घसरणीसह 8,993.85 अंकांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकाचीही स्थिती निराशाजनकच होती. ही घसरण स्वाभाविक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.

सोमवारच्या व्यवहारांमध्ये सर्वाधिक फटका बजाज फायनान्सच्या समभागांना बसला. या समभागांच्या दरामध्ये 10 टक्के घसरण झाली. याशिवाय, महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन, हीरो मोटर कॉर्पोरेशन, आयसीआयीआय बँक आणि टेक महिंद्रा या कंपन्यांचे समभाग घसरले. मात्र, लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, अल्ट्रा टेक, इंडसइंड बँक इत्यादी कंपन्यांचे समभाग वधारले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभागही 2.46 टक्के घसरल्याची नोंद झाली.

सकाळपासूनच घसरगुंडी

सोमवारी शेअरबाजार सुरू झाल्यानंतर त्वरीत चित्र स्पष्ट झाले. प्रारंभीच बाजार 500 हून अधिक अंकांनी खाली गेले. मात्र, दुपारच्या सत्रात काहीशी सुधारणा झाली. पण ती सकाळची त्रुटी भरून काढण्याइतकी मोठी नव्हती. अखेर परिस्थितीसमोर निर्देशांकांनी मान तुकविली.

आंतरराष्ट्रीय बाजारांमध्येही तेच

जगाचा विचार करता, शांघाय, टोकियो आणि इतर महत्वाच्या आशियायी देशांमधील शेअरबाजारांचे निर्देशांक ढासळले. दक्षिण कोरीयातही वेगळी परिस्थिती नव्हती. इस्टर सोमवारमुळे युरोपातील शेअरबाजार बंद होते. रूपयाची किंमतही काहीशी घसरून 76.27 रूपये प्रतिडॉलर इतकी झाली. कच्च्या तेलाचे दर त्यामानाने स्थिर राहतील.  शेअरबाजारांची अवस्था दयनीय झाली आहे मात्र बाजार तज्ञांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे मत व्यक्त केले.

सध्या धाडसी गुंतवणूकदारांना घसरलेल्या समभागांची खरेदी करण्याचा मोह होऊ शकतो. मात्र कोठे गुंतवणूक करावी, याचे अभ्यासपूर्ण भान ठेवून गुंतवरणूकदारांनी निर्णय घ्यावा अशी सूचना अनेक गुंतवणूक व शेअरबाजारतज्ञांनी गेली आहे.

Related Stories

कार्लाइल समुहाची रिलायन्समध्ये गुंतवणूक

Patil_p

विजेच्या वापरात जूनमध्ये वाढ

Patil_p

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये इंधन मागणी वाढण्याचे संकेत

Patil_p

‘मारुती’ची 18,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना

Patil_p

निर्यातीमध्ये सलगची घसरण सुरुच

Patil_p

एपीएल अपोलो टय़ुबचे समभाग वधारले

Omkar B