Tarun Bharat

शेअर बाजारात आठवडय़ाचा प्रारंभ तेजीसोबत

सेन्सेक्स 99 अंकांनी वधारला : रिलायन्स समभागांनी नोंदवला विक्रम

वृत्तसंस्था / मुंबई 

चालू आठवडय़ातील मुंबई शेअर बाजाराचा प्रारंभ हा तेजीच्या प्रवासासोबत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. सदरची कामगिरी करण्यासाठी बाजाराला जागतिक शेअर बाजारामधून सकारात्मक संकेत मिळाले होते. त्याचाच लाभ सोमवारी बीएसई सेन्सेक्सला झाला आहे. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभागांनी उच्चांकी पातळी गाठल्याने रिलायन्सने नवीन विक्रम नोंदवला आहे.

प्रारंभीच्या काळात सेन्सेक्सने 430 अंकाचा टप्पा पार केला होतो. परंतु अंतिम क्षणी शेअर बाजार बंद होताना. मात्र सेन्सेक्स 99.36 अंकांनी वधारुन निर्देशांक 36,693.69 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 34.65 अंकांनी वधारुन निर्देशांक 10,802.70 वर स्थिरावल्याचे पहावयास मिळाले आहे.

प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्मयांनी वधारले आहेत. कारण जिओ प्लॅटफॉर्ममध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील मुख्य कंपनी क्वालकॉमने 0.15 टक्के इतकासा हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केल्यानेच ही यशस्वी कामगिरी करण्यास रिलायन्सला शक्ती मिळाली आहे. यासोबतच अन्य कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, एचसीएल टेक, भारती एअरटेल, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसीचे समभाग तेजीत राहिलेत.

दुसऱया बाजूला मात्र एचडीएफसी बँक, एचडीएफसी यांचे समभाग दोन टक्क्मयांनी घसरले आहेत. एका अहवालानुसार एचडीएफसी बँकेने बँकेमध्ये कर्ज देण्यात गैरमार्ग वापरल्याने त्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. तसेच पॉवरग्रिड कॉर्प, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक आणि कोटक बँक यांचे समभाग घसरले आहेत.

शेअर बाजारात क्यवहाराच्या दरम्यान समभागांच्या विक्री वेळी चढउताराचे वातारण राहिले होते. परंतु जागतिक पातळीवरील शेअर बाजाराच्या कामगिरीने भारतीय शेअर बाजाराला ऊर्जा मिळली आणि त्याच्या जोरावरच सेन्सेन्स 99 अंकांनी तेजी प्राप्त करीत स्थिरावला असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.  यामध्ये शांघायचा हाँगकाँग, टोकिओचा सोल या बाजारातील कंपन्यांच्या कामगिरीचे आकडे प्राप्त होण्याच्या संकेतासोबत बाजार बंद झाले आहेत.

Related Stories

अदानी ग्रीन एनर्जी नफ्यात

Patil_p

टेस्लाकडून भारतात भरतीचे नियोजन

Patil_p

‘कोविड अलर्ट’ ऍप लॉन्च

Patil_p

इंस्टाग्रामचे पिन कमेन्टस फिचर सर्वांकरीता होणार उपलब्ध

Patil_p

ओयोचा कर्मचाऱयांना दिलासा!

Patil_p

अपॅक्सकडून 3 आय इन्फोटेकची खरेदी

Omkar B
error: Content is protected !!