Tarun Bharat

शेअर बाजारात सलगची घसरण सुरुच

तिसरे सत्रही प्रभावीत : सेन्सेक्स 575 अंकांनी कोसळला

वृत्तसंस्था /मुंबई

भारतीय भांडवली बाजारात सलग तिसऱया सत्रात घसरण कायम राहिली आहे. यामध्ये गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स दिवसअखेर 575 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. यामध्ये जागतिक बाजारांमध्ये नकारात्मक कल राहिल्याने मुख्य कंपन्यांपैकी एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.

दिग्गज कंपन्यांमधील कामगिरीनंतर गुरुरवारच्या सत्रात सेन्सेक्स 575.46 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 59,034.95 वर बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 168.10 अंकांनी घसरुन 17,639.55 वर बंद झाला आहे.

मुख्य कंपन्यांमध्ये टायटन, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, विप्रो, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि डॉ.रेड्डीज लॅब हे समभाग लाभासह बंद झाले आहेत.

अन्य घडामोडींचा परिणाम

बाजारांमध्ये सध्या घसरणीचे कारण आहे, की अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरासंदर्भात आक्रमक कल घेतल्याचा परिणाम भारतीय बाजारावर राहिल्याचे दिसून आले आहे.

आशियातील अन्य बाजारांमध्ये हाँगकाँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कॉस्पी, चीनचा शांघाय कम्पोजिट निर्देशांक आणि जपानचा निक्की बाजार घसरणीसह बंद झाला आहे. यासह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव 0.93 टक्क्यांनी वधारुन 102 डॉलर प्रती बॅरेलवर राहिला आहे. द्वि मासिक पतधोरण समितीची बैठक सुरु असल्याने यामध्ये कोणता निर्णय होणार आहे, याकडे गुंतवणूकारांचे लक्ष लागून राहिले आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

 • ऍक्सिस बँक…….. 792
 • आयसीआयसीआय 749
 •  हिंदुस्थान युनि. 2165
 • डॉ.रेड्डीज लॅब…. 4316
 •  महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 834
 •  टेक महिंद्रा…… 1468
 •  सन फार्मा……… 932
 •  इंडसइंड बँक…… 971
 •  एनटीपीसी…….. 153
 •  एचसीएल टेक.. 1173
 •  स्टेट बँक………… 515
 •  एशियन पेन्ट्स. 3155
 •  गोदरेज…………. 781
 • पिरामल एन्टर.. 2354
 • डाबर इंडिया…… 551
 • अंबुजा सिमेंट…… 324
 •  अशोक लेलँड…… 126
 •  मॅक्स फायनान्स. 784
 •  सिप्ला………… 1036
 •  सिमेन्स……….. 2472
 •  ब्रिटानिया……. 3292

समभाग घसरलेल्या कंपन्या

 • टायटन………… 2458
 • एचडीएफसी….. 2462
 • एचडीएफसी बँक 1516
 • विप्रो…………….. 580
 • टीसीएस………. 3684
 • रिलायन्स इंडस्ट्रीज 2571
 • पॉवरग्रिड कॉर्प…. 232
 • भारती एअरटेल… 762
 • टाटा स्टील……. 1349
 • लार्सन ऍण्ड टुब्रो 1826
 • मारुती सुझुकी… 7637
 • आयटीसी……….. 256
 •  नेस्ले…………. 18001
 •  इन्फोसिस……. 1811
 •  बजाज फिनसर्व्ह 16564
 •  कोटक महिंद्रा… 1766
 •  बजाज फायनान्स 7295
 • अल्ट्राटेक सिमेंट. 6733
 •  ओएनजीसी……. 168
 •  विप्रो……………. 580 
 • मॅरिको   512

Related Stories

देशभरात 25,000 टॉवर उभारण्यासाठी 26,000 कोटी मंजूर

Patil_p

विदेशी बाजारपेठेतही घसरण

tarunbharat

बँक ऑफ महाराष्ट्र नफ्यात

Patil_p

पुरवठा थांबवल्याने सन फार्मा बॅकफुटवर

Patil_p

ऑइल इंडियाच्या समभागाचा विक्रम

Amit Kulkarni

सणासुदीच्या काळात मिळणार 5 ते 6 लाख जणांना रोजगार

Patil_p
error: Content is protected !!