Tarun Bharat

शेअर बाजार सोमवारी घसरणीसह बंद

Advertisements

सेन्सेक्समध्ये 638 अंकांची घसरण : फार्मा क्षेत्रातले समभाग वधारले

वृत्तसंस्था / मुंबई

जागतिक बाजारातील नकारात्मक संकेताच्या परिणामास्तव भारतीय शेअर बाजार सोमवारी डळमळतीच बंद झाल्याचे दिसून आले. ऊर्जा आणि फार्मा क्षेत्राच्या निर्देशांकाने काहीसा आधार बाजाराला दिला.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 638 अंकांनी घसरत 56,788 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकदेखील 207 अंकांनी घसरुन 16,887 अंकांवर बंद झाला. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचा समभाग सर्वाधिक घसरला होता.

सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात चढउतार दिसून आला. एकीकडे रिझर्व्ह बँकेचा निर्णय शनिवारी झाला, त्या दिवशी सेन्सेक्स तेजीत होता. पण जागतिक बाजारातील अस्थिरता मात्र सोमवारी बाजारावर दबाव वाढवताना दिसली. दिवसभरात दुपारी निफ्टी निर्देशांक 100 अंकांच्या घसरणीसह 17000 अंकाखाली व्यवहार करत होता तर बीएसई सेन्सेक्स निर्देशांकही 500 अंकांच्या घसरणीसह 56875 अंकाच्या स्तरावर दबावात व्यवहार करत होता.

 मिडकॅप व स्मॉलकॅप 2 टक्के घट नोंदवत होते. निफ्टीत ऊर्जा, माध्यम व फार्मा क्षेत्रांचे निर्देशांक काहीसे तेजीत होते. बँक, धातू व ऑटो निर्देशांक मात्र घसरणीत होते. नैसर्गिक वायुच्या दरात सरकारने वाढ केल्याने ओएनजीसी, ऑईल इंडिया यांचे समभाग 6 टक्के इतके वाढताना दिसले. तर दुसरीकडे नायकाच्या समभागानेही 11 टक्के उसळी घेतल्याचे दिसले. रुपया डॉलरच्या तुलनेत 81.78 वर खाली आला होता. टाटा मोटर्सचा समभाग 1 टक्के घसरणीत तर अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 5 टक्के घसरलेले होते. रिलायन्स इंडस्ट्रीज व मारुती सुझुकीही घसरणीत होते. भारती एअरटेलचा समभाग मात्र तेजीत होता.

 जागतिक बाजारात अमेरिकेतील बाजार, युरोपियन बाजारातही घसरणीचा कल राहिला. आशियाई बाजारात हँगसेंग, कोस्पी व शांघाई कम्पोझिट घसरणीत होता. एकंदर जागतिक अस्थिरतेचे वातावरण येथील शेअर बाजाराला अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलताना दिसत होते.

Related Stories

गुगलच्या नव्या ऍपने विना इंटरनेट जोडता येणार विविध उपकरणे

Patil_p

पाचव्या सत्रात बाजारात तेजीची झुळूक

Amit Kulkarni

अदानी पोर्टस्चा नफा 285 टक्के वाढला

Patil_p

हिरोची नवी मास्ट्रो एज बाजारात

Amit Kulkarni

खेळणी विक्रीत अधिक वाटा मिळवणार

Patil_p

मोबाईल टॉवर उभारण्याच्या नियमात शिथिलता

Patil_p
error: Content is protected !!