Tarun Bharat

शेखर सिंह यांनी घेतला पदभार

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

जेथे जाइं&ल तेथे आपला वेगळा ठसा उमटवणारे जिल्हाधिकारी शेखर सिंह हे सकाळी 11 वाजेपर्यंत पोहचतील अशी आशा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱयांना वाटत होती. त्याकरता त्यांच्या स्वागताचे नियोजन केले होते. गडबड सुरु होती परंतु ते चार वाजता साताऱयात पोहचतील अशी माहिती मिळाल्यानंतर मात्र त्यामध्ये बदल केला गेला. अन् चार वाजण्याच्या सुमारास साताऱयात शेखर सिंह पोहचले. त्यांचे सुरुवातील शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातील शिष्ठमंडळाने स्वागत केले. पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात मावळत्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी त्यांना आपल्या पदाचा पदभार सोपवला. साताऱयाबाबत त्यांनी काही बाबी बोलून दाखवल्या.

 जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बदली झाल्यानंतर ते कधी पदभार स्वीकारतील याकरता जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच कर्मचाऱयांचे कान आतुरलेले होते. आज सकाळपासून त्यांच्या स्वागताची तयारी सुरु होती. कोणी फुलांचा बुफे आणून ठेवला तर कोणी फुलांचा हार आणून ठेवला होता. सातारी कंदी पेढे आणून ठेवले. दुपारी चार वाजता येणार हे निश्चित झाल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांच्याकडे त्यांच्या स्वागताची तयारी सोपवण्यात आली होती. तर शासकीय विश्रामगृहावर एक टीम  त्यांच्या स्वागतास होती. अगोदर तेथे त्यांचे स्वागत झाल्यानंतर प्रेश होवून ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. त्यांचे स्वागत माजी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पुष्पगुच्छ देवून केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी  सुनिल थोरवे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, किर्ती नलावडे, संगीता चौगुले, अश्विनी जिरंगे, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते, सातारच्या तहसीलदार आशा होळकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांचे स्वागत झाल्यानंतर त्यांच्याशी साताऱयांच्याबाबत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी चर्चा केली.

आता तंबाखुमुक्त शासकीय कार्यालये होणार

अधिकारी बदलला की कायदाही प्रभावीपणे राबवला जातो. शासकीय कार्यालयाच्या आवारात तंबाखू, गुटखा हे पदार्थ खाता येत नाही. मात्र, काही कर्मचारी अधिकारी हे तंबाखूचा तोबरा भरुन इतरांना व्यसन करु नका म्हणून सांगत असतात. अशांची आता पुरतीच बोबडी वळली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही असे काही कर्मचारी आहेत. त्यांची तर असली व्यसनेच बंद होण्याची शक्यता आहे.

Related Stories

पुणे-सातारा-कराड रेल्वेची शटल सेवा सुरु करा

Patil_p

कोयनेचे पाणी मुंबईला नेण्यात कसले राजकारण?

Patil_p

सातारा : कोरोनाचा तेरावा आठवडा जास्त दाहक : जिल्ह्यात भयकंप

Archana Banage

एसटीच्या चाकांना सोमवारी ब्रेक

Patil_p

खाणीत मृतदेह सापडलेल्या ‘त्या’ युवकाचा खूनच

Patil_p

सातारा : जगतापवाडीत पिण्याच्या पाण्यातून अळ्या येण्याचे थांबेना

datta jadhav
error: Content is protected !!