Tarun Bharat

शेख झाएदचे क्युरेटर मोहन सिंग कालवश

वृत्त संस्था/ अबु धाबी

अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमची खेळपट्टी तयार करणारे मुख्य क्युरेटर मोहन सिंग यांचे रविवारी निधन झाले. मोहन सिंग हे मोहालीचे रहिवासी होते. रविवारच्या अफगाण-न्यूझीलंड सामन्यासाठी या स्टेडियमची खेळपट्टी मोहन सिंग यांनी तयार केली होती.

2004 सप्टेंबरमध्ये मोहन सिंग यांचे अबु धाबीत आगमन झाले. पंजाब क्रिकेट संघटनेच्या मोहालीतील स्टेडियमची खेळपट्टी मोहन सिंग यांनी बनविली आहे. 1994 पासून ते पंजाब क्रिकेट संघटनेमध्ये मैदान आणि खेळपट्टी सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. न्युझीलंड आणि अफगाण यांच्यातील रविवारचा सामना सुरू होण्यापूर्वी क्युरेटर मोहन सिंग आपल्या खोलीमध्ये मृतावस्थेत आढळले.

Related Stories

नायके-नेमार यांच्यातील करार रद्द

Patil_p

रोहितच्या वादळात ऑस्ट्रेलिया भुईसपाट!

Patil_p

रणजी स्पर्धेतील उपांत्यपूर्व लढती आजपासून

Patil_p

नदालची सलामीची लढत ओपेल्काशी

Patil_p

डब्ल्यूव्ही रमण यांची बीसीसीआयकडे तक्रार

Patil_p

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूसाठी मदतनिधी

Patil_p