Tarun Bharat

शेगावला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; 5 ठार

ऑनलाईन टीम / बुलढाणा :

सोलापूरपाठोपाठ बुलढाण्यातही भाविकांवर काळाने घाला घातला आहे. शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला जाण्यासाठी निघालेल्या बोलेरो गाडीचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या घटनेत 5 जण जागीच ठार झाले. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. देऊळगाव राजाजवळ पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, जालनाजिल्ह्यातील अंबड गावचे भाविक गजाजन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला बोलेरो गाडीतून जात होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या बोलेरोला ट्रकची समोरासमोर धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की बोलेरोच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. या घटनेत पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना देऊळगाव राजा आणि जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

गौतम गंभीरला धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून, तपासात मोठा खुलासा

Archana Banage

बार्शीतच कोरोना प्रयोग शाळेस परवानगी द्या – आमदार राऊत

Archana Banage

खासदार नवनीत राणा यांची तब्येत बिघडली; नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल

Tousif Mujawar

शिरोळ नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध

Archana Banage

अब्दूलाट महापूर घोटाळ्याची चौकशी करुन फेरसर्व्हे करा

Archana Banage

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तीन लाखांचे बिनव्याजी पीककर्ज मिळणार

Tousif Mujawar
error: Content is protected !!