तरुण भारत

शेगाव चोरी प्रकरणी एका संशयितास जत पोलिसांकडून अटक; एक आरोपी फरार

जत/प्रतिनिधी

जत तालुक्यातील शेगाव येथे एका रात्रीत तीन दुकान फोडून ५८ हजाराचा हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी संशयित आरोपी महादेव रंगनाथ पवार (वय ४९, रा. माळीनगर ता. माळशिरस) यास पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. पवार यांच्या सोबत असलेला सहआरोपी रामा काळे (रा. उस्मानाबाद) पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. आरोपी महादेव पवार यास न्यायालयासमोर ऊभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेगाव येथे दि. २४ एप्रिल रोजीच्या मध्यरात्री किशोर गिफ्ट सेंटर, यशराज फुटवेअर व श्रीराम इलेक्ट्रिकल्स अशी तीन दुकाने फोडून ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.यातील महादेव पवार या एका आरोपीस अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली ही केली आहे. दि. ११ मे रोजी मध्यरात्री विजयपूरहुन जतकडे हा आरोपी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता, त्यास पकडण्यात आले त्याच्याजवळ ६०० रुपयांची कॉपर वायर व तवेरा कार गाडी जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार गोडसे करीत आहेत.

Advertisements

Related Stories

हा विजय कार्यकर्ते, मतदारांना समर्पित : जयंत पाटील

Abhijeet Shinde

सांगली : आमराई उद्यान सेल्फी पॉइंट ठरणार

Abhijeet Shinde

सांगली : कडेगाव तालुक्यात ‘ढोल बजाओ, सरकार जगाओ’ला प्रतिसाद

Abhijeet Shinde

एकत्र लढलो असतो तर सत्ता गेली नसती- जयंत पाटील

Abhijeet Shinde

‘विचारांवर अधारीत संघटना असेल तर कार्यकर्ते झपाटून काम करतात’ : पालकमंत्री

Abhijeet Shinde

आमदार, खासदारांचा पगार-मानधन एका टप्प्यात, मग एफआरपी दोन टप्प्यात का?, स्वाभिमानी जिल्हाध्यक्षांचा सवाल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!