Tarun Bharat

शेटये कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा

वीज कर्मचारी राजकुमार शेटय़े आत्महत्या प्रकरणी सुदिन ढवळीकरांची मागणी

प्रतिनिधी / पेडणे

वझरी येथील आत्महत्या केलेल्या वीज कर्मचाऱयाच्या कुटुंबियांची भेट घेऊन मगो नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सांत्वन केले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी या कुटुंबियाची भेट घेऊन सत्य परिस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी केले.

बुधवारी सायंकाळी मगो नेते सुदिन ढवळीकर राजकुमार शेटय़े यांच्या घरी जाऊन त्यांच्या  कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या सोबत पेडणे मतदारसंघाचे मगो नेते प्रवीण आर्लेकर, मांदे मतदारसंघाचे मगो नेते जीत आरोलकर, उगवेचे उपसरपंच सुबोध महाले, पेडणे मगो प्रवक्ते उमेश तळावणेकर, कार्यकर्ते गणपत किनळेकर, उत्तम कशालकर आदी यावेळी उपस्थित होते.

आत्महत्या प्रकरणात नक्कीच काळेबेरे :  सुदिन ढवळीकर

वीज कर्मचारी राजकुमार शेटय़े यांनी आत्महत्या का केली, यावर मी बोलत नाही. मात्र मुख्यमंञी डॉक्टर प्रमोद सावंत तसेच प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी त्यांच्या कुटुंबियांची स्वतः येऊन भेट घेऊन सत्य माहिती जाणून घ्यावी. दोघांनीही  कुणालाही सोबत न घेता वडिलांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी यावेळी सुदिन ढवळीकर यांनी पीडित कुटुंबीयाची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केली. जे वडिलांनी सांगितले त्यात खूप गोष्टी येतात. त्यामुळे नक्कीच  काहीतरी काळेबरे आहे.

हेल्पर लाईनमन यांची बदली आठ किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर करता येते का, याचा नियम पाहवा लागेल. आठ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर बदली करण्यासाठी खास नियम केला का? याबाबत माहिती मिळवणार व विधानसभेत याबाबत प्रश्न विचारणार याची मुख्यमंत्र्यानी नोंद घ्यावी, असे माजी मंत्री ढवळीकर म्हणाले.

सुदिन ढवळीकर असे म्हणाले. 2007 पासून रमेश शेटय़े हे भाजपचे कार्यकर्ते व पर्रीकर यांचे समर्थक होते. मग आताच असे काय घडले, यांची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाणून घ्यावी व या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी सुदिन ढवळीकर यांनी केली.

 पेडणे मतदारसंघात उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे सध्या सूडाचे राजकारण करत असून नोकरी करणाऱया नागरिकांची त्यांनी छळवणूक करू नये. ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले त्यांच्यावर राजकीय वजन वापरून त्यांना विनाकारण त्रास देऊ नये, असे आवाहन पेडणेचे मगो नेते प्रवीण आर्लेकर यांनी केले आहे.

  पेडणे तालुक्मयातील वझरी येथील राजकुमार रमेश शेटये या 32 वषीय युवकाने  सोमवारी दि. 1 मार्च रोजी विषारी द्रव्य प्राशन केले. बांबोळी येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

राजकुमार शेटये याची पेडणे तालुक्मयातून डिचोली तालुक्मयात बदली करण्यात आली होती. नेहमीप्रमाणे तो सोमवारी कामावर गेला होता. तो दुपारी आला. जेवण झाल्यावर घरात कोणी नाही, अशी संधी साधून घरात असलेले गवत मारण्यासाठी ठेवलेले विषारी औषध प्राशन केले होते.

Related Stories

होय, मी साखळीतूनच निवडणूक लढविणार.

Amit Kulkarni

बोरी गोपाळकृष्ण मंदिरात आज उत्सव

Amit Kulkarni

मनोहर पर्रीकर यांची आज जयंती

Amit Kulkarni

बस अपघातात 20 जण जखमी

Patil_p

मॉन्सेराते यांच्या विजयाचा श्रेय भाजप लाटत आहे – वाल्मिकी नाईक

Abhijeet Khandekar

दुहेरी नागरिकत्वाचा अहवाल पाठवा

Patil_p