Tarun Bharat

शिराळा-चांदोली रस्त्यावर शेडगेवाडी फाटा येथे 5 लाखांची चोरी

Advertisements

प्रतिनिधी / कोकरुड

शिराळा-चांदोली रस्त्यावर असणाऱ्या शेडगेवाडी फाटा येथील अंबिका स्टील सेंटर मध्ये 5 लाखांची चोरी झाली. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेची नोंद कोकरुड पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

शिराळा-चांदोली रस्त्यावर शेडगेवाडी फाटा या ठिकाणी जयंतीलाल रामलाल ओसवाल यांच्या मालकीचे अंबिका स्टील या नावाने दुकान आहे. तेथून ते सळी, सिमेंट, फरशी अनेक प्रकारच्या साहित्याचा विक्री व्यवसाय अनेक वर्षांपासून करत आहेत. तेथे ते लहान भाऊ, पत्नी व दोन मुले यांच्यासह दुकानाच्या वर रहात होते. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ते दुकान बंद करुन सर्व कुटूंबियांसह जेवण करण्यासाठी बाहेर गेले होते. जेवण करुन दहाच्या सुमारास परतले असता घराचे दरवाजे उघडे असल्याचे त्यांना दिसले. आत जाऊन पाहिले असता कपाटात असणारी रोख रक्कम 5 लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले असल्याचे उघड झाले. मंगळवारी रात्री उशिरा जयंतीलाल ओसवाल यांनी याबाबतची तक्रार कोकरुड पोलिसात दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करत आहेत. दरम्यान बुधवारी सकाळी इस्लामपूर पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करत अधिक तपासासाठी मार्गदर्शन केले आहे.

Related Stories

मिनाक्षीताई महाडिक यांचे सरपंच पद रद्द करु पाहणाऱ्यांना चपराक

Archana Banage

जेसीबीच्या खोऱ्यात अडकून कुपवाडचा तरुण ठार

Archana Banage

हवामानातील बदल सर्वस्वी सूर्यावरच अवलंबून : डॉ. राजमल जैन कोठारी

Archana Banage

गोव्याहून राजस्थानकडे निघालेली बस मेनी फाटा येथील पुलावरून ओढ्यात कोसळली, ७ जखमी

Archana Banage

इस्लामपुर भाजी मंडईसाठी १५ तर रस्ते विकासासाठी १० कोटी : मंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

Archana Banage

कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेसला अखेर हिरवा कंदील; पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची झाली सोय

Archana Banage
error: Content is protected !!