Tarun Bharat

शेण अन् गोमुत्राने करत आहेत आंघोळ

कोरोनापासून बचावासाठी विचित्र उपाय

कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेने भारतात सर्वाधिक प्रभाव पाडला आहे. शहरांसह गावांमध्येही लोक या विषाणूने संक्रमित होत आहेत. यामुळे अनेक असहाय्य लोक विषाणूपासून बचावासाठी चित्रविचित्र उपाय करत आहेत. पण डॉक्टर्स सातत्याने या उपायांपासून दूर राहण्यास सांगत आहेत.

गुजरातमध्ये काही लोक गोशाळेत जाऊन स्वतःच्या शरीरावर शेण फासून घेत असून गोमुत्र प्राशन करत आहेत. यामुळे कोरोनाविरोधी लढय़ात इम्युनिटीला मजबूत केले जाऊ शकते असे त्यांचे मानणे आहे. गोशाळेत अनेक डॉक्टर्सही जात असून गायीचे शेण आणि गोमुत्रामुळे इम्युनिटी चांगली होत असल्याचे त्यांचे मानणे आहे. तसेच त्यानंतर ते कोरोनाबाधितांवर उपचार कुठल्याही भीतीशिवाय करत असल्याचे एका फार्मा कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक गौतम मणिलाल बोरिसा यांनी म्हटले आहे.

गोशाळेत येणारे लोक गायीचे शेण शरीरावर फासून घेतल्यावर योगक्रिया करत आहेत. पण अनेक डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांनी मान्यताप्राप्त नसलेल्या उपचारांमुळे त्रास अधिक वाढू शकतो असा इशारा दिला आहे.

गायीचे शेण किंवा गोमुत्रामुळे कोरोनाविरोधात इम्युनिटी चांगली केली जाऊ शकते याचा कुठलाच वैज्ञानिक पुरावा नसल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर जे.ए. जयलाल यांनी म्हटले आहे. गायीच्या शेणाचे सेवन केल्याने माणसांन होणाऱया आजारांचा धोका वाढतो याचबरोबर गोशाळेत अनेक लोक पोहोचल्याने सोशल डिस्टन्सिंगवरून स्थिती बिघडत असल्याचेही त्यांनी नमूद पेले आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील भाजप आमदार सुरेंद्र सिंग यांनी कॅमेऱयासमोर गोमुत्र प्राशन केले होते. गोमुत्रामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविले जाऊ शकते असा दावा त्यांनी केला होता.

Related Stories

अफगाणिस्तानवर सर्वपक्षीय बैठक होणार

Patil_p

आरोपी आफताबची प्रकृती बिघडली

Patil_p

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा कट उधळला

Patil_p

राज्यांना ‘म्युकरमायकोसिस’वरील औषधाच्या 23,680 वायल्स

datta jadhav

विधानपरिषदेसाठी सवदींना तिकीट मिळणार?

Patil_p

उपचारासाठी सिंगापूरला जाणार लालूप्रसाद यादव

Patil_p
error: Content is protected !!