Tarun Bharat

शेतकरी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकऱयांना मोदी सरकारकडून सीमेवरच रोखण्यात आले असून, दिल्लीत जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. केंद्र सरकारने आंदोलनासाठी सुचवलेला बुरारी मैदानाचा पर्याय नाकारत शेतकऱयांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. काही शेतकऱयांनी छुप्या मार्गाने दिल्लीत प्रवेश केला असला तरी अजूनही शेकडो शेतकरी दिल्लीच्या ‘सीमा’रेषांवरच तळ ठोकून आहेत. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी चर्चेची तयारी दर्शवली असली तरी संतप्त शेतकऱयांनी पंतप्रधानांचा पुतळा जाळत सरकारचा निषेध केला आहे.

संसदेत कायदे मंजूर केल्यापासून शेतकरी राज्यांमध्येच आंदोलन करत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत शेतकऱयांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. विशेषतः पंजाब, हरियाणात या कायद्यांविरोधात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. शेतकऱयांनी दिल्लीतील निरंकारी समागम मैदानावर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करावे असा प्रस्ताव केंद्राकडून देण्यात आला. हा प्रस्ताव शेतकऱयांनी नाकारला असून, दिल्लीतील रामलीला अथवा जंतरमंतर मैदानावरच आंदोलन करू, अशी ठाम भूमिका शेतकऱयांनी घेतली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱया शेतकऱयांना हे आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे. तसेच सरकार सर्व मुद्यांवर चर्चेसाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

वॉटर कॅनन बंद करणाऱयावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱयांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यात दिल्लीच्या दिशेने येणाऱया शेतकरी मोर्चाला रोखण्यासाठी त्यांच्यावर करण्यात आलेल्या पाण्याच्या फवाऱयाला बंद करणाऱया अंबालाच्या एका युवकावर हत्येचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वॉटर कॅनन बंद करण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 26 वषीय नवदीप सिंह हा शेतकरी आंदोलनाचा ‘हिरो’ झाला आहे. हरियाणा-अंबालातील शेतकरी नेत्याचा मुलगा असलेल्या नवदीप सिंहने त्या गाडीवर चढून पाण्याचा फवारा बंद केला होता. त्याच्यावर आता पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हय़ासाठी कायद्यात आजीवन कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

नियोजित स्थळी या, चर्चा करुया : शहा

शेतकऱयांच्या तीव्र आंदोलनामुळे शेतकरी संघटनांशी लवकरात लवकच चर्चा करण्याची तयारी सरकारने चालवल्याचे दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंबंधी संघटनांना नियोजित स्थळी दाखल होत चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनानुसार शेतकऱयांना बुरारी मैदानावर दाखल व्हावे लागणार आहे. शहांच्या वक्तव्याला अनुसरून पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही शेतकरी संघटना चर्चेसाठी पुढे होण्याची सूचना केली आहे. मात्र, आता याप्रश्नी रविवारीच तोडगा अपेक्षित आहे.

Related Stories

व्याजमाफीच्या स्थितीत 6 लाख कोटींचा भार

Patil_p

पोलिसांसाठी ‘एक देश, एक गणवेश’?

Patil_p

पंधरा दिवसात तीन अभिनेत्रींची आत्महत्या

Patil_p

‘अँटिना’चा प्रवास पूर्णपणे संपुष्टात

Amit Kulkarni

सासऱ्यांच्या घरावर चालविला बुलडोझर

Amit Kulkarni

पंजाबमध्ये 3 दहशतवादी शस्त्रसाठय़ासह अटकेत

Amit Kulkarni