Tarun Bharat

शेतकरी आंदोलन मुद्द्यावर राहुल गांधी यांचे ट्विट; म्हणाले …

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. बुधवारी त्यांनी शेतकरी आंदोलन या मुद्द्यावर ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.


राहुल गांधी यांनी ट्विट करत शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, शेतकरी आपली शेती व देशाच्या रक्षणासाठी मरत आहेत. पण ते घाबरलेले नाहीत आणि आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. असे सांगितले आहे.  

  • मागील 6 महिन्यापासून आंदोलन सुरू 


दरम्यान, नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्यानंतरही कोणताही तोडगा निघालेला नसल्याने शेतकरी मागे हटण्यास तयार नाही. या आंदोलना दरम्यान, काही शेतकऱ्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे.आपल्या मागण्यांसाठी लढणाऱ्या 500 शेतकऱ्यांनी आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र अद्यापही कायदा रद्द करण्यासंबंधी कोणताही निर्णय झालेला नाही.


यासोबतच ट्विटरला #500DeathsAtFarmersProtest हा हॅशटॅग सध्या ट्रेंडिंगला आहे. 

दरम्यान, किसान एकता मोर्चाने ट्वीट करत लढा सुरु होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांनी जीव गमावणाऱ्या शेतकऱ्यांचे फोटोही शेअर केले आहेत. जोपर्यंत विजय होत नाही तोवर आम्ही आंदोलन चालू ठेवू असे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

कर्नाटक : एसएसएलसी परीक्षा पुढे ढकलल्या

Archana Banage

‘मिशन लाईफ’मधून पर्यावरणासोबत जगण्याचा मंत्र

Amit Kulkarni

पुण्यात म्हाडाच्या 5 हजार घरांची सोडत, उद्यापासून ऑनलाईन नोंदणी

datta jadhav

केंद्र सरकारच्या विरोधात ममता बॅनर्जींचे आंदोलन

Patil_p

आता पुण्यातही ‘राज’ गर्जना?

datta jadhav

अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार

Patil_p
error: Content is protected !!