Tarun Bharat

शेतकरी कर्जमाफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी / शिरोळ

भारतीय स्टेट बँकेच्या धोरणानुसार ऊस पीक अर्जदार कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा या मागणीचे निवेदन माजी आमदार उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना आज देण्यात आले.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहेत की भारतीय स्टेट बँक शाखेच्या कडून बँकेच्या ऊस पीक धोरणानुसार ऊस पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. चालू वर्षी महापूर व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे पीक कर्जाची रकम भरणे मुश्किल झाले आहे. पूरग्रस्त बाधित क्षेत्रात कर्जमाफी देताना जिल्हास्तरीय धोरणानुसार प्रति हेक्‍टर एक लाख रुपये लाभ देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

स्टेट बँकेच्या नियमानुसार हेक्टरी सव्वा लाख ते दीड लाख रुपये पर्यंत पीक कर्ज देण्यात आले आहे. परंतु प्रति हेक्‍टरी एक लाख रुपये पूरग्रस्तांची कर्जमाफी मिळणार असल्याचे समजते ज्या बँकाकडून पीक कर्ज घेतले त्या बँकेच्या पिक कर्जानुसार एका हेक्टरच्या मर्यादेपर्यंत घेतलेल्या कर्जाच्या मुद्दलाची रक्कम त्यावरील 31 ऑगस्ट 19 पर्यंत व्याजाची रक्कम अशा एकूण कर्ज माफी देण्यात येणार आहे. परंतु याचा लाभ अल्पप्रमाणात शेतकऱ्यांना मिळणार असून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार पीक कर्ज बँकांनी वाटप केले आहेत त्या पद्धतीनेच कर्जमाफी मिळावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे
यावेळी कवठेगुलंद येथील नितीश निंबाळकर, प्रदीप पाटील, सचिन राजमाने, सतीश पाटील, सचिन पाटील, विलास भगत, रामदास जगताप, बाळासो पाटील, शिवगोंडा पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

महाराष्ट्र कर्नाटक राज्यपालांच्या बैठकीला प्रारंभ

mithun mane

राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धात कोरे इंग्लीस अकॅडमी तृतीय

Archana Banage

गांधीनगर येथे क्रिकेट बेंटिगवर छापा, चौघांना अटक

Archana Banage

कोल्हापूरचा अनिकेत ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबशी करारबद्ध

Abhijeet Khandekar

तालमीत गणपती आणि मोहरमही…

Archana Banage

कोरोना रुग्णालाच रुग्णालयात बेड उपलब्ध न झाल्याने नातेवाईकांची वणवण (व्हिडिओ)

Archana Banage