Tarun Bharat

शेतकरी घरी परतल्याच्या अफवा; मागण्या मान्य होईपर्यंत कुठेही जाणार नाही

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्लीतील आंदोलनस्थळांवरुन शेतकरी घरी परतण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. जोपर्यंत एमएसपीबाबत कायदा होत नाही आणि शेतकऱ्यांविरुद्ध दाखल असलेले गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत कोणताही शेतकरी येथून जाणार नाही. आमची 4 डिसेंबरला बैठक आहे. मागण्या पूर्ण झाल्यानंतरच आम्ही निघून जाऊ, असे राष्ट्रीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितले.

टिकैत म्हणाले, कृषी कायदे रद्दचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. त्यानंतर शेतकरी आंदोलन मागे घेतील असे सरकारला वाटत होते. मात्र, एमएसपीबाबत कायदा आणि शेतकऱयांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतल्यानंतरच शेतकरी घरी परतणार आहेत. शेतकरी आंदोलनस्थळापासून घरी परतल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, शेतकरी कुठेही गेला नाही.
गाझीपूर, सिंघू, शाहजहानपूर आणि टिकरी सीमेवर शेतकऱयांचे आंदोलन सुरूच आहे.

Related Stories

रणगाडाविरोधी गाईडेड क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी

Patil_p

ट्विटरकडून राहुल गांधींवर कारवाई

Patil_p

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे ‘स्मार्ट स्टीक’

Patil_p

दिल्ली : लग्नाच्या वाढदिवशी पतीने शुभेच्छा न दिल्याने पत्नीने घेतला गळफास

Tousif Mujawar

पाकिस्तानच्या मंत्र्याची भारताच्या विरोधात नवी वल्गना

Patil_p

सलग दुसऱया दिवशीही कोरोना रुग्णसंख्येत वाढ

Amit Kulkarni