Tarun Bharat

शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

रस्ते-रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

शेतकरी संघटनांनी कृषी कायद्याविरोधात 26 मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. हा बंद 12 तासांचा असून सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. या ‘भारत बंद’दरम्यान दुकाने, बाजारपेठा व व्यापारी संस्था बंद राहतील. तसेच दूध, फळे आणि भाज्या यासारख्या आवश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित होऊ शकतो. शेतकरी संघटनांकडून दिल्ली परिसरात व्यापक निदर्शने होण्याची शक्यता असल्याने दिल्ली-आगरा महामार्ग जाम होऊ शकेल. दिल्ली परिसरासह काँग्रेसशासित राज्यांमध्येही या बंदचे परिणाम दिसून येऊ शकतील. काँग्रेस, राष्ट्रवादीसह देशभरातील काही शेतकरी आणि व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शवलेला आहे.

केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱया शेतकरी संघटनांनी शुक्रवारी ‘भारत बंद’ पुकारला आहे. शेतकऱयांच्या ‘भारत बंद’च्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा पोलीसही सतर्क झाले आहेत. संवेदनशील जिह्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा मोडणाऱयांवर पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाणार असल्याचे दिसत आहे. आंदोलक शेतकऱयांकडून रस्ते, रेल्वे वाहतूकही विस्कळीत करण्याची योजना आहे.

Related Stories

नियम धाब्यावर बसवून पार्ट्या करणाऱ्यांवर होणार कारवाई

Archana Banage

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून दिल्ली प्रदूषणावर चर्चा; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं

Abhijeet Khandekar

भ्रष्टाचाराविरोधात सर्वोच्च न्यायालय पंतप्रधानांसमवेत

Patil_p

महाराष्ट्रात 3721 नवे कोरोना रुग्ण; तर 1962 रुग्ण कोरोनामुक्त

Tousif Mujawar

गुजरात-मोरबीमध्ये 12 मजुरांचा मृत्यू

Patil_p

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

Archana Banage
error: Content is protected !!