Tarun Bharat

शेतकरी संघाच्या `ब्रँड’ चा विस्तार

मीठ, काडेपेटी, वॉशिग पावडर, खाद्यतेलही बाजारात, मेनबत्ती, मिनरल वॉटर, कापूर, उदबत्ती उत्पादनाची तयारी

विठ्ठल बिरंजे / कोल्हापूर

कोरोनाच्या महामारीत देशातील अनेक उद्योग बंद पडल। काही अडचणीत आले. सहकारी संस्थांचे व्यवहरा मंदावले मात्र या कठीण काळातही आशिया खंडातील पहिला असलेल्या शेतकरी संघाने मात्र स्वत:चा `ब्रँड’ टीकवलाच नाही तर उत्पादनांचा विस्तार करीत चांगलीच भरारी घेतली आहे. दैनंदीन वापरात आवश्यक असलेल्या वस्तूंची निर्मितीचा विस्तार केला आहे. चटणी, गरम मसाला हळद, मिश्र, दाणेदार खतांबरोबर सध्या प्रयोगीक तत्वावर आणलेली मीठ, आगपेटी, वॉशिंग पावडर उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली असून आता तेल, मिनरल वॉटर, मेनबत्ती, अगरबत्ती, कापूर कापूस वात ही उत्पादनेही  बैल छाप `ब्रँड’ ने लवकरच बाजारात येणार आहेत.

   कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प झाले. याचा सर्वच क्षेत्रावर कमी अधिक प्रमाणात परिणाम झाला. अनेकांचे रोजगार बुडाले, नोकऱया गेल्याने काटकसर सुरु झाली. त्यामुळे दैनंदिन वापरात लागणाऱया वस्तूंचा उठाव कमी झाला. काहींचा तर खपच थांबल्याने उत्पादने बंद झाली. अशा भीषण परिस्थिती शेतकरी संघाने मात्र धाडसी पाऊल टाकले आहे. संघाचा बैलछाप हा `ब्रॅंड’ ची आजही बाजारात चर्चा आहे. संघाने गुणवत्ता आणि विश्वासर्हते बाबत कधीच तडजोड केली नाही. म्हणूनच दाणेदार आणि मिश्र ही दर्जेदार खतांचे पैसे देवून वर्षभर अगाऊ बुकींग झालेले असते. चटणी, हळदपुड, गूळ, गरम मसाल्या बाबतही ही स्थिती आहे. मुंबईसह कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश आदी राज्यांमध्ये बैलछाप`ब ब्रँडला मागणी आहे. मिराची पूड, हळद, गरम मसाला ही उत्पादने तर साता समुद्रापार पोहचली आहेत.  अंबाबाईच्या दर्शनासाठी भवानी मंडपात आलेला प्रत्येक भाविक `बैल छाप’ असलेले एक तरी उत्पादन खरेदी करतोच.

 एकाच छातखाली मापक दरात खात्रीशीर वस्तू देण्याचा प्रयत्न- अमरसिंह माने

शेतकरी संघ ही संस्था शेतकऱयांनी स्थापन केलेली आहे. सभासदांना दर्जेदार, गुणवत्तेचा माल मिळाला पाहिजे यासाठी संचालक मंडळ नेहमी अग्रही असते. असे माजी चेअरमन अमरसिंह माने यांनी सांगितल. ते म्हणाले, सभासदांबरोबर वर्षाकाठी जवळपास तीस हजार लोक संघाच्या विविध शाखेतून माल खरेदी करतात. यापूर्वी  उत्पादने मर्यादीत होती. संघाकडे पुरेसा कर्मचारी, पायाभूत सुविधा आहेत. याचा वापर करुन आणखी उत्पादने बाजारात आणली तर संस्थेची उलाढाल वाढेल त्याच बरोबर ग्राहकांनाही एकाच छातखाली मापक दरात खात्रीशीर वस्तू मिळतील या दुहेरी उद्देशाने हे पाऊल टाकले आहे.

कच्चा माल उत्पदकांशी करार- मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ

खर्चात काटकसर करुन वस्तूचे दर कसे आवाक्यात राहतील यावर भर दिला आहे गेली महिनाभरात पाच लाख रुपांचे मीठ आणि तीन लाख रुपयांची आगपेटी विकली. या विक्रीतून दीड लाख रुपये नफा मिळाला. दुसऱयाचे ब्रँड विकण्यापेक्षा स्वत:च्या ब्रँडने वस्तू विकल्यास संघाला अधिक लाभ होतो हे लक्षात आल्यानंतर पाऊल टाकले आहे. अन्य कच्चा माल उत्पदकांशी करारही केले आहेत.

गुणवत्तेशी तडजोड नाही

संघाने आतापर्यंत सभासद, ग्राहक हीत डोळÎासमोर ठेवून कारभार केला आहे. त्यामुळे बैलछाप ब्रँड ला बाजारात किंमत आहे. ही गुणवत्ता, दर्जा टिकवून सभास, संघाचे हीत जोपासत आहोत,

 जी. डी. पाटील,चेअरमन शेतकरी संघ

Related Stories

कोल्हापूर जिल्हा बँकेचे कर्मचारी सुनील लाड यांना हृदयविकाराचा झटका

Archana Banage

दूधगंगा कालव्यात पडले गवे

Archana Banage

न्यू कॉलेजचे माजी ग्रंथपाल प्रा. पी. सी. पाटील यांचे निधन

Archana Banage

व्यावसायिकाची १८ लाखाची फसवणूक

Archana Banage

विद्यापीठातील विविध पदांसाठी १४ नोव्हेंबरला निवडणूक

Archana Banage

कोल्हापुरात पावसाची जोरदार एंट्री; वादळी वाऱ्यासह गारपीट

Archana Banage