प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यातील पशुधन पर्यवेक्षकांचा बेमुदत संप अखेर मिटला असून बुधवार पासून नियमित सेवा सुरु करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी पशुधन पर्यवेक्षकांसह इतर मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेत असल्यची घोषणा पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. सुनील काटकर यांनी केली. त्यांच्याबरोबर संपात सहभागी झालेले खासगी डिप्लोमा धारकांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे.
राज्यात शासनाच्या जिल्हा परिषद सेवेत पशुधन पर्यवेशक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी गट-ब या संवर्गाचे सुमारे साडेचार हजार कर्मचारी असून 2 हजार 853 पशुवैद्यकीय दवाखान्याचे संस्था प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसाठी काही दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरु केले होते. याची दखल घेत विधान परिषद सभापती नरहरी झिरवळ यांनी तातडीने विधीमंडळात बैठक घेतली. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार महेश चव्हाण, आमदार मंजुळा गावित, आमदार सरोज अहीर, आमदार नीलेश लंके, आमदार राहुल कूल, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त बैठकस उपस्थि होते. त्यामुळे अखेर 1 ऑगस्टपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. सकारात्मक चर्चा झाल्याने संप मागे घेतला.