Tarun Bharat

शेतकर्‍यांच्या सर्वांगिण विकासासाठी ‘चिंचणेर पॅटर्न’ दिशादर्शक

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयोग केले गेले आहेत. शेतकर्‍यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी चिंचणेर निंब गावात कृषी विभागामार्फत शेतीविकासासाठी राबवलेले विविध उपक्रम राज्यातील शेतकर्‍यांना दिशादर्शक ठरु शकतात, असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे यांनी केले.

कृषी संजीवनी सप्ताहाअंतर्गत मौजे चिंचणेर निंब (ता.सातारा) येथे आयोजित सोयाबीन शेतीशाळेस मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे, तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ तसेच कृषी महाविद्यालय, कराडचे प्राचार्य भोईटे, कृषी विज्ञान केंद्र, बोरगांवचे कार्यक्रम समन्वयक श्री.शिर्के व इतर अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

कृषीदिन साजरा करताना, या दिवशी शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढीसाठी, मनरेगा अंतर्गत बांधावर फळबाग लागवडीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याशिवाय शेतकर्‍यांच्या क्षेत्रावर आयोजित विविध प्रात्यक्षिके पाहणेसाठी शिवारफेरीचे नियोजन केले होते. चारा टंचाई काळात पशुधनासाठी पौष्टिक व दर्जेदार चारा उपलब्ध होणेच्या दृष्टीने उपयुक्त असा मुरघास तसेच सेंद्रिय शेतीचा कणा असलेले जिवामृत बनवण्याचे प्रात्यक्षिक तसेच शेतकर्‍यांना घरच्याघरी व वाजवी खर्चात तयार होणारी सेंद्रिय खते निर्मितीसाठी नाडेप व गांडूळ खत युनिटचा पायाभरणी कार्यक्रमही यावेळी पार पडला.

सेंद्रिय शेतीमध्ये गावास स्वयंपुर्ण बनवणेसाठी जिवामृत बॅंकेची स्थापना, शेतातला काडीकचरा व ऊसाची पाचट शेतातच कुजवणे, खोडवा ऊस पिकात धैंचा लागवड, ताग इ. हिरवळीच्या खताचे प्रकल्प, तसेच हुमणी किड नियंत्रणासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचा लेखाजोखा कृषी सहाय्यक धनाजी फडतरे यांनी अत्यंत प्रभावीपणे शिवारफेरीदरम्यान मांडला.

याशिवाय रुंद वरंबा व सरी पध्दतीने तसेच अत्याधुनिक टोकण यंत्राने पेरणी केलेल्या ‘फुले संगम’ या सोयाबीन पिक क्षेत्राची शिवारभेट व प्रत्यक्ष शेतकर्‍यांशी सुसंवाद करुन शिवारफेरीची सांगता झाली. शेतीशाळा वर्गादरम्यान निवडक शेतकर्‍यांना निविष्ठांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यांत आले. शेतकर्‍यांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या सदर सोयाबीन शेतीशाळा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी सुहास यादव यांनी तर आभारप्रदर्शन कृषी सहाय्यक धनाजी फडतरे यांनी केले. कार्यक्रमांचे नेटके संयोजन कृषी विभाग व ग्रामस्थांनी केले.

Related Stories

शिवाजी पार्कवरील एण्ट्रीपूर्वीच मनपाची कारवाई ; नारायण राणेंचे बॅनर हटवले

Abhijeet Shinde

भाजपकडून राज्य सरकारच्या नावाची होळी साजरी

Patil_p

लक्ष्मण माने, घरतांवर गुन्हा दाखल होण्यासाठी आंदोलन

Patil_p

मराठा आरक्षण मुद्दा राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात पेटण्याची शक्यता

Abhijeet Shinde

वसगडे – माळवाडी मार्गावरील ‘ती फांदी’ जीवघेणी

Abhijeet Shinde

आता संभाव्य महापूराची माहिती देणार ‘कर्ण’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!