Tarun Bharat

शेतकर्‍यांना मदत मिळवून देणे हीच माझी दिवाळी – समरजितसिंह घाटगे

Advertisements

मिणचे खुर्द / वार्ताहर

 शेतकर्‍यांना शासनाकडून त्यांच्या हक्काची मदत मिळवून देणे.हीच  खरी माझी दिवाळी आहे .असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. कोळवण ता भुदरगड येथे राजर्षि  छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याची जनपंचायत शिवार संवाद कार्यक्रम वेळी शेतकर्‍यांचा संवाद साधताना ते बोलत होते.

  दिवाळी सणाची सुरूवात  शेतकऱ्यांच्यावतीने साजऱ्याकेल्या जाणाऱ्या वसुबरसने दारवाड येथे गोमाता व वासराच्या पुजनाने छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याची जनपंचायत शिवार संवाद कार्यक्रमाचा प्रारंम केला.

कोळवण ता. भुदरगड येथील गुरवकी नावाच्या शिवारात झालेल्या शिवार संवाद कार्यक्रमासाठी ते शेताच्या बांधावरुन अंदाजे किलोमीटर इतके अंतर शेतकऱ्यांसह चालत गेले. तिथे चालत जात असताना  भात वाळवणी सुरू असलेल्या  शेतकऱ्यांसोबत सुप हातात घेऊन भात वारे दिले.व कोणत्याही परिस्थितीत आपण शेतक-यांसोबत असल्याचा संदेश दिला. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना अतिवृष्टीने नुकसान होऊन सडलेल्या भुईमुगाच्या शेंगा व विळा भेट देऊन शासन दरबारी मदतीबाबात आवाज उठवावा.असे साकडे घातले.

ते पुढे म्हणाले, शासनाने जाहीर करूनही न मिळालेले प्रोत्साहनात्मक अनुदान, अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेली तोकडी मदत, अन्यायी वीज दरवाढ यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे.त्यांनी दिवाळी साजरी कशी करायची ? असा संतप्त सवाल उपस्थित करून शेतकऱ्यांच्या या परिस्थितीमुळे मी अस्वस्थ होऊन शेतकऱ्यांच्या बांधावर समस्या जाणून घेण्यासाठी पोहोचत आहे.असेही ते म्हणाले.

दिवाळीत राजा बांधावर आणि व्यथा शेतकऱ्यांच्या ओठावर

आज सर्वत्र दिवाळी सण साजरा केला जात असताना शाहू कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे  यांनी कोळवण सारख्या ग्रामीण भागातील शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे वचन दिले. दिवाळी सणाच्या निमित्ताने राजा बांधावर आणि शेतकऱ्यांच्या व्यथा ओठावर अशी अवस्था या दौऱ्याच्या निमित्ताने पहावयास मिळाली.

Related Stories

ग्रामपंचायती बिनविरोध करणाऱ्या गावांना अकरा लाखांचा निधी

Archana Banage

गस्त घालणाऱ्या वनरक्षकावर खुनी हल्ला

Archana Banage

Kolhapur; ‘इंटिलेक्चुअल प्रॉपर्टी राईटस्’चा पेपर सोमवारी

Abhijeet Khandekar

‘शाळा बंद’च्या अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई

Kalyani Amanagi

‘वंचित बहुजन’ सर्व निवडणुका स्वबळावर लढणार

Archana Banage

उचगाव व्यापाऱ्यांच्या लुट प्रकरणी तपास पथके रवाना

Archana Banage
error: Content is protected !!