Tarun Bharat

शेतकऱयांकडून विजयोत्सव साजरा

कित्तूर चन्नम्मा चौकात पेढे वाटून व्यक्त केला आनंद : यापुढेही अन्यायाविरोधात लढणार

प्रतिनिधी /बेळगाव

शेतकऱयांनी हौतात्म्य पत्करल्यानंतर केंद्र सरकारने काळे कायदे रद्द केले. शेतकऱयांनी तब्बल एक वर्ष यासाठी अहोरात्र आंदोलन केले. उन, थंडी, पाऊस याची तमा न बाळगता हे आंदोलन केल्याने यश आले आहे. उशिरा का असेना केंद्र सरकारला शहाणपण आले आणि काळे कायदे रद्द करून शेतकऱयांना दिलासा मिळाला. शेतकऱयांचा हा विजय असून यापुढे अशाच प्रकारे अन्यायाविरोधात लढा लढण्याचा निर्धार शेतकऱयांनी व्यक्त केला.

कित्तूर चन्नम्मा चौक येथे जोरदार घोषणाबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जाचक कायद्यांविरोधात आम्ही अनेकवेळा आंदोलने केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दिल्लीच्या सीमेवर उत्तर भारतातील शेतकऱयांनी उग्र आंदोलन केले. याचबरोबर देशातील इतर शेतकऱयांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आज हा विजयोत्सव साजरा करत आहोत, असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली.

केंद्र सरकारने शेतकऱयांना विश्वासात न घेता हे काळे कायदे लागू केले. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार होता. शेतकऱयांवर अनेकवेळा अन्याय करण्यात आले. वाहने चालवून शेतकऱयांना चिरडण्यात आले. तरीदेखील शेतकरी हटला नाही. आपला स्वाभिमान राखून लढा दिला. हा लढा यशस्वी झाला. अखेर लोकशाहीचा विजय झाला, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. यावेळी शेतकरी प्रकाश नाईक, जयश्री गुरण्णावर, चुन्नाप्पा पुजेरी यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.

लोकशाहीचा विजय : ऍड. नागेश सातेरी

केंद्र सरकारने जे काळे कायदे लागू केले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. शेतकऱयाच्या अस्तित्वालाच धक्का निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकऱयांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले. या आंदोलनाला यश आले असून लोकशाहीचा विजय झाला, असे ऍड. सातेरी यांनी सांगितले.

जाचक काळे कायदे रद्द : निवृत्त प्रा. आनंद मेणसे

केंद्र सरकारविरोधात शेतकऱयांनी दिल्ली येथे केलेले आंदोलन चिरडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र शेतकऱयांनी त्या अन्यायाविरोधात लढा सुरूच ठेवला. जाचक काळे कायदे रद्द झाले. अजूनही जे खासगीकरण सुरू आहे त्या विरोधात लढा देणे गरजेचे आहे. मात्र ही लढय़ाची नांदी झाली असून लोकशाहीचा विजय झाला आहे. यापुढे अशाच प्रकारे लढा लढून देशात लोकशाही ठेवण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील राहील.

 शेतकऱयांची बाजू भक्कम : सिद्धगौडा मोदगी

केंद्र सरकारच्या शेतकऱयांविरोधात तीन कायद्यांविरोधात आम्ही वेळोवेळी लढा दिला. आम्हाला अटक झाली. मात्र आम्ही त्याला घाबरलो नाही. दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा दिला. देशातूनच पाठिंबा मिळाल्यामुळे शेतकऱयांची बाजू भक्कम झाली आणि अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमते घेऊन ते जाचक कायदे मागे घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आमचा विजय झाल्याचे ते म्हणाले.

Related Stories

कारवार येथे चोरीप्रकरणी तिघांना अटक

Omkar B

केवळ सव्वा तासात 14 लाखांची घरफोडी

Amit Kulkarni

महिलेच्या गळय़ातील साडेचार तोळय़ाचे दागिने चोरटय़ांनी भरदुपारी लांबविले

Amit Kulkarni

विडंबनाचे हसरे रूप प्रकट होणे आवश्यक

Patil_p

वैद्यकीय शिक्षण संस्थांविरोधात अभाविप आक्रमक

Amit Kulkarni

कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.माधुरी शानभाग

Patil_p