Tarun Bharat

शेतकऱयांचा शेतात मृत्यू झाल्यास 5 लाखांची मदत

अपंगत्व आल्यास 2 लाख

 ऑनलाईन टीम / लखनऊ : 

शेतात काम करताना शेतकऱयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा उत्तरप्रदेश सरकारने केली आहे.

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजनेअंतर्गत शेतकऱयांच्या कुटुंबियांना ही मदत दिली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत शेतकरी अथवा त्याच्या कुटुंबियांपैकी कोणाचा शेतात काम करताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तर शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ 18 ते 70 वर्षापर्यंतच्या शेतकऱयांना आणि त्याच्या कुटुंबियांना मिळणार आहे. उत्तर प्रदेशातील 2 कोटी 38 लाख 22 हजार शेतकऱयांना या योजनेचा लाभ होणार आहे.

Related Stories

उत्तरप्रदेश अन् बिहारचा नकाशा लवकरच बदलणार

Patil_p

14 महिन्याच्या मुलीच्या आईची सुटका

Patil_p

भारतातील लोकशाही केवळ काल्पनिक!

Omkar B

हिमाचलप्रदेश : पुढील 10 दिवसात 250 रुग्ण होणार कोरोनामुक्त; आरोग्य विभागाने केला दावा

Tousif Mujawar

कोरोना काळात केंद्राकडून 5 मिनी बजेट एवढी मदत

datta jadhav

“लवकरच कोरोना संपणार;” विषाणूशास्त्रज्ञांचा दावा

Archana Banage