Tarun Bharat

शेतकऱयांचे आज राज्यव्यापी ‘रास्ता रोको, जेल भरो’ आंदोलन

राज्य, राष्ट्रीय महामार्गांवर निदर्शने करणार

प्रतिनिधी/ बेंगळूर

केंद्र सरकारची तीन कृषीविषयक विधेयके व राज्य सरकारच्या भू-सुधारणा विधेयकाविरोधात शेतकरी संघटनांनी शुक्रवार दि. 25 सप्टेंबर रोजी ‘रास्ता रोको, जेल भरो’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध राज्य रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली 32 हून अधिक संघटनांनी आंदोलन हाती घेतले असून राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर रास्ता रोको केला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता आहे.

रास्ता रोको, जेल भरो आणि 28 रोजी कर्नाटक बंदबाबत सर्व जिल्हे, तालुक्यांमध्ये तयारी करण्यात आली आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱयांना आवाहन केले आहे. भू-सुधारणा विधेयक, एपीएमसी दुरुस्ती विधेयकांना विरोध दर्शवून मागील चार दिवसांपासून शेतकरी संघटना बेंगळूरमध्ये अहोरात्र आंदोलन करीत आहेत.

पोलीस अधिकाऱयांना सूचना

अतिरिक्त पोलीस महासंचालक अमरकुमार पांडे यांनी राज्यातील सर्व पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली आहे. शेतकऱयांच्या आंदोलनावेळी अनुचित घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी वारिष्ठ पोलीस अधिकाऱयांना दिली आहे.

Related Stories

कर्नाटक: ‘या’ तारखेपासून महाविद्यालये पुन्हा सुरू होणार

Archana Banage

कोविड लॅबमधील कंत्राटी कर्मचाऱयांनाही भत्ता

Amit Kulkarni

पक्षाध्यक्षांच्या सूचनेवरून मंत्रिपदाचा राजीनामा

Amit Kulkarni

कर्नाटकात शुक्रवारी ५,७८३ नवीन बाधितांची नोंद

Archana Banage

कर्नाटकात नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट

Archana Banage

कर्नाटक : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लसीकरण

Archana Banage