Tarun Bharat

शेतकऱयांच्या आंदोलनाला येथील शेतकऱयांनी दिला पाठिंबा

जाचक कायदे रद्द करा, जिल्हाधिकाऱयांना निवेदन 

प्रतिनिधी/ बेळगाव

केंद्र सरकारने शेतकऱयांविरोधात कायदे अंमलात आणले आहेत. त्या कायद्याविरोधात उत्तर भारतातील शेतकऱयांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. थेट दिल्लीला धडक या शेतकऱयांनी मारली आहे. त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून तातडीने शेतकऱयांवर अन्याय करणारे कायदे रद्द करावेत, अशी मागणी शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

देशात कोणीही शेती खरेदी करु शकतो, असा जो कायदा काढला आहे त्यामुळे मोठय़ा कार्पोरेट कंपन्या जमिनी खरेदी करण्याची शक्मयता आहे. त्यामुळे मूळ शेतकरी हा भूमीहीन होणार आहे. तेंव्हा तो कायदा रद्द करावा यासह एपीएमसीसाठी जो नवीन कायदा अंमलात आणला आहे तोही रद्द करावा, या मागणीसाठी हे आंदोलन आहे.

देशातील शेतकऱयांना केंद्र सरकारने दिशाभूल केली असून शेतकरी आता जागृत झाला आहे. यापुढे आम्ही तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा शेतकऱयांनी दिला आहे. उत्तर भारतातील शेतकरी दिल्लीकडे जात असताना त्यांच्यावर दडपशाही करण्यात येत आहे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारे दडपशाही करणे हे योग्य नाही. तेंव्हा त्याचा आम्ही निषेध करत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी सिध्दगौडा मोदगी, शिवाजी कागणीकर, अर्जुन गौडा, चांगदेव देसाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

नदाफ-पिंजार समाजासाठी निगमची स्थापना करा

Patil_p

हिंडाल्को हद्दीतील रस्ता बंद केल्याने शेतकरी-नागरिकांची गैरसोय

Amit Kulkarni

नंदगड गाव आजपासून पूर्णतः सीलडाऊन

Amit Kulkarni

विजापूर जिल्हय़ात 81 अहवाल निगेटिव्ह

Patil_p

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Tousif Mujawar

लक्ष्मीपूजनाची सर्वत्र धामधूम

Patil_p