Tarun Bharat

शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून संघाच्या भाजपला कानपिचक्या

Advertisements

नोएडा / वृत्तसंस्था

पुढील वर्षीच्या प्रारंभी होणाऱया पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांमध्ये अंतर्गत खलबते सुरू आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखली जात असतानाच आरएसएसने काही त्रुटी दाखवत भाजपला फटकारल्याची चर्चा आहे. नोएडा येथे नुकतीच आरएसएसच्या वरि÷ नेत्यांची उत्तर प्रदेशचे मंत्री आणि भाजप नेत्यांसोबत रणनितीसंबंधी बैठक झाली. या बैठकीत मागील वर्षीपासून दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत संघाच्या नेत्यांनी भाजपला सतर्क केले आहे. आंदोलक शेतकऱयांबाबत संवेदनशील दृष्टीकोन बाळगावा आणि कुठल्याही समुदायाला विरोध करणे टाळा, असे आरएसएसने भाजप आणि मोदी सरकारला सुनावले आहे.

पंजाब आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुका पाहता, आरएसएसने भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी काही सल्ले दिले आहेत.  शेतकऱयांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशात परिस्थिती शांत करण्याची गरज आहे, असे मत संघनेत्यांनी व्यक्त केले आहे. नवी दिल्लीच्या सीमेबरोबरच पश्चिम-उत्तर प्रदेशमध्ये कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आरएसएसने यापूर्वीही शेतकरी आंदोलनाबाबत सरकारने घेतलेल्या भूमिकेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

सत्ताधारी पक्ष उत्तर प्रदेशात काही भागात वास्तव्यास असणाऱया शीख आणि जाट समुदायाच्या लोकांसोबत शत्रूत्व ओढवून घेत आहे. त्याचा दगाफटका भाजपला बसू शकतो, असेही आरएसएसचे म्हटले आहे. तसेच आंदोलक शेतकऱयांबाबत शांततेची भूमिका घेणे गरजेचे आहे, असेही संघाचे संयुक्त सरचिटणीस कृष्ण गोपाल यांनी नोएडातील बैठकीत सांगितल्याचे समजते.

अन्य समुदायांमध्येही भाजपविरोधात रोष

पंजाबमधील शीख आणि जाट समुदायामध्ये पक्षाबद्दल प्रचंड रोष आहे. शेतकरी आंदोलकांची तुलना ही खलिस्तान्यांशी करण्यावरून अजूनही भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळेच शीख समुदायामध्ये पक्षाची प्रतिमा आणखी ढासळण्याची शक्मयता आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपसाठी कृषी कायदे हा एकमेव प्रभावी मुद्दा नसला तरी गेल्या काही दिवसांपूर्वी लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारामुळे आणखी भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे.

Related Stories

दिल्लीत मिळणार मोफत लस; 1.34 कोटी लस खरेदी करणार : अरविंद केजरीवाल

Rohan_P

कर संकलनामध्ये 22.5 टक्क्मयांची घसरण

Patil_p

काँग्रेस नेत्यांसोबत नरेश पटले यांची चर्चा

Patil_p

तालिबानचे समर्थन करणाऱ्या १४ भारतीयांना ठोकल्या बेड्या

Abhijeet Shinde

कोरोनावर प्रभावी ‘कॉकटेल ड्रग’चा दिल्लीत वापर

datta jadhav

देशात मागील 24 तासात वाढले 43,082 रुग्ण

datta jadhav
error: Content is protected !!