Tarun Bharat

शेतकऱयांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱयांनी घेतली बैठक

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

शेतकऱयांना देण्यात आलेली बियाणे खराब निघाली आहेत. ठिबक सिंचन योजना राबविताना शेतकऱयांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत नाही. वीज पुरवठा वेळेत करण्यात येत नाही. खताचा तुटवडा आहे. याचबरोबर खत काळय़ाबाजाराने विक्री करण्यात येत आहे. असा आरोप शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आला. यावेळी कृषी अधिकाऱयांनी या समस्या जाणून घेऊन लवकरच त्या दूर करू, असे आश्वासन शेतकऱयांना देण्यात आले आहे.

कोरोनामुळे शेतकरी अनेक समस्यांना तेंड देत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी शेतकऱयांची बैठक बोलाविली होती. यामध्ये शेतकऱयांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. महाराष्ट्रातून सोयाबिन बियाणे आयात करण्यात आली होती. ती बियाणे खराब निघाली आहेत. त्यामुळे संबंधित कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.

पिक विम्यासाठी शेतकऱयांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत नाही. याचबरोबर बँक व सोसायटय़ा शेतकऱयांकडून पिक विमा घेण्यास बऱयाचवेळा टाळाटाळ करत आहेत. तेंव्हा संबंधित बँका व सोसायटय़ांना सक्त ताकीद करावी, अशी मागणी करण्यात आली. वीज पुरवठा वारंवार खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण जात आहे. तेंव्हा वीज पुरवठाही सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली.

चौकशी करण्याचे आश्वासन

ठिबक सिंचन योजना राबविताना संबंधित कंपनीचे मालक शेतकऱयांची फसवणूक करत आहेत, असा आरोप शेतकऱयांनी यावेळी केला. त्यावर त्याची चौकशी करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिले. याचबरोबर उपस्थित असलेल्या विविध कंपनींच्या प्रतिनिधींनाही जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सूचना केल्या आहेत. कृषी अधिकारी झिलाणी मोकाशी यांनी सर्व समस्या जाणून घेवून त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. या बैठकीला रवी सिद्धमन्नावर, राजू मरवे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

बेटणेतील बेपत्ता महिलेचा अद्याप शोध नाहीच

Amit Kulkarni

जैन इलेव्हन, जैन स्पार्टन्स, जैन सुपरकिंग संघांची विजयी सलामी

Patil_p

शहापूर येथील किराणा दुकाने 6 च्या आत बंद

Patil_p

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत

Amit Kulkarni

माध्यमिक विभागाची सहामाही परीक्षा उद्यापासून

Amit Kulkarni

राष्ट्रपुरुषांच्या अवमानामागे सुनियोजित षड्यंत्र?

Patil_p
error: Content is protected !!