Tarun Bharat

शेतकऱ्यांच्या हितासाठी इथेनॉलला प्राथमिकता

‘पर्यावरण दिना’निमित्तच्या संवादात पंतप्रधानांचे प्रतिपादन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जागतिक हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज असून इथेनॉलचा वापर 21 व्या शतकातील भारताची प्राथमिकता असेल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. इथेनॉलवर लक्ष केंद्रीत केल्याने त्याचा फायदा देशातील शेतकऱयांना होणार आहे. 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करायचा संकल्प आपण केला असून त्यासाठी एक रोडमॅप जाहीर करण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयातर्फे संयुक्तरित्या शनिवारी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘उत्तम पर्यावरणासाठी जैव इंधनाला प्रोत्साहन’ ही या कार्यक्रमाची संकल्पना होती. यावेळी बोलताना जागतिक हवामान बदलाच्या संकटाबद्दल भारत जागरुक असून त्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारत सक्रियतेने काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

गेल्या सहा-सात वर्षांमध्ये भारताची रिन्यूएबल एनर्जीची क्षमता ही 250 पटींहून अधिक झाल्याचे सांगत सध्या वापरात असलेल्या रिन्यूएबल एनर्जीच्या क्षमतेबाबत भारत जगातील पहिल्या पाच देशांच्या यादीत असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. गेल्या सहा वर्षाच्या काळात भारताच्या सौर उर्जेची क्षमता ही जवळपास 15 टक्क्मयांनी वाढली असल्याचेही ते म्हणाले.

Related Stories

फडणवीसांच्या बंगल्याबाहेरील आंदोलन स्थगित

datta jadhav

चिंताजनक : दिल्लीत 8,593 नवे कोरोना रुग्ण; 85 मृत्यू

Tousif Mujawar

चांदोली पर्यटन स्थळाच्या विकासासाठी आराखडा तयार करा- पालकमंत्री जयंत पाटील

Abhijeet Khandekar

कमर्शियल सिलिंडर 102 रुपयांनी स्वस्त

Patil_p

१८ तारखेनंतर भूमिका मांडणार- राजू शेट्टी

Archana Banage

यशवंत सिन्हा यांचा ‘तृणमूल’मध्ये प्रवेश

Patil_p